रंग तुझ्या जीवनाचे
सांग कसे शोधू
तुला समोर पाहताना
तुझ्या रंगात न्हाऊन जाऊ .
बेधुंद रंग तुझे
रुसले माझ्या ललाटावर
सांग कसे बोलू
आयुष्याच्या या वळणावर..
रंग होता जीवनात
मिठीत तुझ्या येऊन
गुलाबी भावना हरवल्या
मस्तीत गीत गाऊन.
अंबर झुकते सागरी
मिलन होते दर्पणी
पावसाची सर येता
अश्रू वाहतात नयनी..
अशी ही सख्या आपुल्या
आयुष्याची कहानी
सगळ्या रंगात
रंगुनी सजली ही प्रेमदिवानी…
©® *कवयित्री. सौ *अनिता कळसकर*
*कल्याण*