डोंबिवली :- खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आयोजित डोंबिवली रासरंग दांडियाचा फीवर आता टिपेला पोहोचला असून रविवारी प्रख्यात अभिनेत्री अमृता खानविलकर, दिप्ती श्रीकांत, अभिनेता राकेश बापट आदी नामांकित कलाकार डोंबिवलीकरांच्या भेटीला आले होते. हजारो डोंबिवलीकरांसह रासरंगच्या रंगात रंगत त्यांनी गरबा आणि दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला. प्रख्यात मिमिक्री आर्टिस्ट डॉ. संकेत भोसले यांनीही उपस्थितांशी संवाद साधत धमाल उडवून दिली.
‘डोंबिवली रासरंग’ने सलग दुसऱ्या वर्षी तरुणाईचा ताबा घेतला असून दररोज हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी डोंबिवली (पूर्व) येथील डीएनसी मैदानावर सुरू असलेल्या या जल्लोषात सहभागी होत आहेत. दांडियाच्या या जल्लोषासो
गतवर्षी प्रथमच आयोजित ‘डोंबिवली रासरंग’ला डोंबिवलीकरांप्रमाणेच ठाण्यापासून अंबरनाथपर्यंतच्या तब्बल एक लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली होती. यंदाही जल्लोषात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दांडिया फेम मनीषा सावला यांची धम्माल गाणी आणि बिपिनचंद्र चुनावाला यांच्यासह पार्थ गांधी, सिद्धेश जाधव, वाचा बिपिन आदींच्या गाण्यांच्या तालावर नवरात्रीचे नऊ दिवस उत्साहपूर्ण वातावरणात डोंबिवलीकर थिरकणार आहेत.
गरबा आणि दांडियासोबतच रविवारी अस्सल मराठमोळ्या भोंडल्याचेही आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेत्री दिप्ती श्रीकांत ही देखील या भोंडल्यात सहभागी झाली होती. पारंपरिक वेशभूषेत आणि मराठमोळ्या साजशृंगारासह अतिशय उत्साहाने डोंबिवलीकर महिला मोठ्या प्रमाणावर या भोंडल्यात सहभागी झाल्या होत्या. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या उपक्रमाला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, आमदार सुभाष भोईर, महापौर विनिता राणे,डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे, रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, महिला संघटक कविता गावंड,किरण मोंडकर, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील,प्रकाश म्हात्रे, भाऊसाहेब चौधरी आदींचे सहकार्य लाभले आहे.