अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेचे माजी नगरसेवक धनंजय सुर्वे यांनी नुकताच भारिप मध्ये प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वी धनंजय सुर्वे यांनी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन भारिप सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी नुकतीच तोरणा शासकीय विश्रामगृहात संपन्न झालेल्या भारिपच्या बैठकीत भारिप प्रवेशाबाबत स्थानिक कार्यकर्त्यांसह चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी भारिपच्या केंद्रीय कार्यालयात भारिप ठाणे जिल्हाध्यक्ष सारंग थोरात, जिल्हा निरीक्षक रतन बनसोडे यांच्या उपस्थित पक्षात प्रवेश केला. यावेळी अंबरनाथ शहराध्यक्ष अविनाश गाडे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शेषराव वाघमारे तसेच भारिप पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
धनंजय सुर्वे यांनी आर.पी.आय (आठवले गट) तसेच आर.पी.आय (सेक्युलर) या पक्षांचे शहराध्यक्ष पद आणि ते दोन वेळा अंबरनाथ नगरपालिकेत बहुमताने नगरसेवक म्हणून निवडूनही आलेले आहेत. सुर्वे यांनी रिपाई आठवले गट आणि रिपाई सेक्युलरमध्ये काम करत असताना अनेक आंदोलनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे.