ठाणे : ठाणे जिल्ह्याच नाव आणि आपल्या संस्कृतीला अटकेपार नेणारे व पारंपरिक पध्द्तीने सण उत्सव मोठ्या आनंद उत्साहात साजरे करून ठाणे जिल्ह्याची एक वेगळी ओळख निर्माण करणारे ठाण्याचे अनभिषेक्त सम्राट गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांची टेंभी नाका येथील नवसाला पावणारी दुर्गेश्वरी तसेच
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांनी कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर खऱ्या अर्थानं घंटानाद करून एक वेगळा इतिहास रचून तमाम हिंदू बांधवांना दुर्गाडी गडावरील मातेच्या मंदिराची दारे सर्वांसाठी दर्शनासाठी खुले करून दिली अशा दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गा मातेचं दर्शन तसेच मराठी डॉन म्हणून ज्यांची ओळख आहे असे अरुण गुलाबी गवळी अर्थात सर्वांचे लाडके डॅडी यांच्या दगडी चाळीतील दुर्गामातेच तसेच आनंद आश्रमात जाऊन दिघे साहेबांचं प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी दर्शन घेतलं व समाजसेवेचा दिघे साहेबांचा समाजसेवेचा वसा वारसा सामाजिक कार्यातून अखंडपणे असाच चालू राहावं यासाठी दुर्गा मातेला साकडं घातलं यावेळी धर्मवीर आनंद दिघे यांचे शिलेदार उपस्थित होते.