ठाणे

महापालिका क्षेत्रातील बॅनर्स-होर्डिग्‍ज तात्‍काळ हटविण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश

डोंबिवली   : पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत  शहरात अ‍नधिकृत ठिकाणी उभारण्‍यात आलेल्‍या व परवानगी नसलेल्‍या पोस्‍टर्स, बॅनर्स व होर्डिग्‍ज त्‍वरित काढून शहर होर्डिंग्‍जमुक्‍त करावे असे आदेश  दिले. या बैठकीत अनधिकृत बांधकाम धारकांवर गुन्हे दाखल करन्याचे आदेश दिले.
साप्‍ताहिक आढावा बैठकीत आयुक्‍तांनी विविध कामांचा आढावा घेवून प्रभागक्षेत्र अधिका-यांना त्‍यांच्‍या प्रभागातील अनधिकृत बांधकामधारकांवर गुन्‍हे दाखल करुन सदर बांधकामे निष्‍कासित करण्‍याचे आदेश दिले. नियंत्रक अनधिकृत बांधकामे तथा कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांना फेरिवाल्‍यांचे सर्व्‍हेक्षण तात्‍काळ पूर्ण करुन त्‍यांचा प्रश्‍न मार्गी लावावा, असेही त्‍यांनी निर्देश दिलेत.साथरोग नियंत्रण कृती आराखडयाची अंमलबजावणी करून साथरोगांच्‍या फैलाव होणार नाही, याची काळजी घेण्‍याच्‍या सूचना वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. लवंगारे यांना दिल्‍या. डॉ. लवंगारे यांनी सदर कृती आराखडयाची अंमलबजावणी वैद्यकीय आरोग्‍य विभागामार्फत करण्‍यात येत असून आतापर्यंत एकुण ५०९२९ घरांमध्‍ये ४५०४६ पाण्‍याच्‍या टाक्‍यांची तपासणी करण्‍यात आल्‍याची माहिती यावेळी त्‍यांनी दिली. तपासणीअंती सुमारे ८१२ पाण्‍याचा टाक्‍या दुषित आढळून आल्‍याने त्‍या रिकाम्‍या करण्‍यात आल्‍याचे सांगितले. त्‍याचप्रमाणे सदर भागातील एकुण १२७२ ताप रुग्‍णांचे रक्‍तनमुन्‍यांची तपासणी करण्‍यात आलेली असून त्‍यांचेवर थेट घरातच औषधोपचार करण्‍यात आले असल्‍याचे सांगितले.कोणीही ताप अंगावर काढू नये, ताप आल्‍यास त्‍वरीत नजिकच्‍या रुग्‍णालयात वैद्यकीय अधिका-यांच्‍या सल्‍याने औषधोपचार करावा. हयगय करु नये, महापालिकेच्‍या रुग्‍णालयांत जावून रक्‍त तपासणी करुन घ्‍यावी. आठवडयातील एक दिवस पाणी साठे स्‍वच्‍छ करुन कोरडा पाळावा, असे आवाहन वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी डॉ. राजू लवंगारे यांनी केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!