कोकण

माऊली बचत गट पालवण ( लांबेवाडी ) व लाईफ केअर हॉस्पिटल,चिपळूण आयोजित  आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोकण :      ग्रामीण भागात कधी-कधी आरोग्याची सेवा देणारी साधने हि कमी पडत असतात.धावपळीच्या  जीवनात लोकांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात..त्याना यथायोग्य उपचार मिळावे या उद्देशाने सोमवार दि.१५ ऑक्टोबर २०१८ रोजी माऊली बचत गट पालवण लांबेवाडी व लाईफ केअर हॉस्पिटल चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर पालवण ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आले होते.नियोजित शिबिरातून जनरल तपासणी, आय.सी. यू.तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, महात्मा फुले जीवनदायी योजना मधून करण्यात येणाऱ्या मोफत उपचाराबद्दल माहिती,मोफत औषध वाटप व इतर वैद्यकीय सुविधांचे मार्गदर्शन उपस्थित लाईफ केअर हॉस्पिटलच्या सर्व तज्ञ डॉक्टर यांनी ग्रामस्थांना केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे उपस्थिती लाईफ केअर हॉस्पिटलचे अड्मिन ऑफिसर डॉ.अमर भोसले तसेच डॉ.प्राची दिलवाले, डॉ.प्रियांका घाडीगावकर,डॉ.विनिता किंजलकर, डॉ.रेडिज, डॉ.मधुरा बापट, असिस्टंट अभिजित सुर्वे अशी लाईफ केअर हॉस्पिटलची संपूर्ण टीम उपस्थित होती.

गाव प्रमुख बाबाजी सुर्वे, सरपंच गणपत साटले, तंटा मुक्ती अध्यक्ष नयन सुर्वे, माजी सरपंच गंगाराम भुवड, माऊली बचत गट कमिटी अध्यक्ष सुरेश लांबे, उपाध्यक्ष अनंत लांबे, सेक्रेटरी निलेश लांबे,जि.प.मराठी शाळेचे शिक्षक वृंद यांची उपस्थिती होती.उपस्थित मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने शाल..श्रीफळ..पुष्पगुच्छ देऊन यथोचित स्वागत केले.या भव्य दिव्य शिबिराला पालवण गाव,निवळी गाव,मांडकी, ढोक्रवली ई.गावातील ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला.

माऊली बचत गटाचे सर्व सभासद व कार्यकारिणी तसेच लाईफ केअर हॉस्पिटल चे सहकार्य यांच्या विशेष मेहनत प्रयत्नांतून हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश लांबे यांनी उत्तमरीत्या करून आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता केली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!