ठाणे

स्तनांच्या कर्करोगाविषयी मुंबईच्या गल्लोगल्लीत जनजागृती

  ‘जागतिक कर्करोग जनजागृती महिना’ या खास कार्यक्रमाचे औचित्य साधून गुणवती जगन्नाथ कपूर फाऊंडेशनच्या वतीने उपक्रम
अंबरनाथ :    गुणवती जगन्नाथ कपूर फाऊंडेशन ही संस्था गेल्या १८ वर्षांपासून कर्करोगाचे रुग्ण, महिला यांच्यासोबत कार्यरत आहेत. ‘जागतिक कर्करोग जनजागृती महिना’ या खास कार्यक्रमाचे औचित्य साधून मुंबईमधील चेंबूर या ठिकाणी स्तनांच्या कर्करोगाविषयी जागृती मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत पथनाट्य आणि माहिती सत्रद्वारे चेंबूर मधील ठक्कर बाप्पा कॉलीनी, सिद्धार्थ नगर, वाच्छला ताई नाईक नगर या विभागातील महिला आणि पुरुषांना स्तनांच्या कर्करोगाविषयी माहिती देण्यात आली.
         स्तनांचा कर्करोग म्हणजे काय? या आजाराची लक्षणे आणि संबधित प्रतिबंधात्मक उपाय योजना याविषयी वस्ती पातळीवर विस्तृत माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात विभागातील महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. महिलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे संस्थेच्या मान्यवरांच्या मार्फत देण्यात आली व त्यांच्या सर्व प्रश्नांचे निरसन करण्यात आले. तसेच या कर्करोगाविषयी काही माहिती हवी असल्यास या संस्थेच्या ०२२२४९३६९८१ व ०२२२४९३९२१४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!