दिवा (बातमीदार) – दरवर्षी प्रमाणे यावर्षीही दिवा रोहा गाडीत दसरा उत्साहात साजरा झाला. दसऱ्याच्या दिवशी ऑफिसला सुट्टी असल्यामुळे ज्यांच्या सोबत आपण दिवसाचे ३ ते ४ दिवस घालवतो त्यांनाच शुभेच्छा देता येत नसल्याने हा सण आदल्या दिवशी उत्साहात साजरा केला जातो.. यावेळेस दिवा रोहा गाडीला फुलांनी, रंगीत पताकांनी, झेंडूंच्या तोरणांनी सजवले जाते. देवीच्या फोटोची पुजा करुन आरती केली जाते. नंतर प्रसाद वाटून सर्वजण एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतात. दिवा रोहा गाडीतील प्रवाशांचा उत्साह हा खरचं उल्लेखनीय असतो. त्यावेळी दिवा प्रवासी संघटना अध्यक्ष आदेश भगत, दिवा स्टेशन मास्तर, दिवा रेल्वे कर्मचारी आणि पोलिसांचाही मिठाई देऊन सत्कार केला.
दिवा रोहा गाडीत दसरा उत्साहात साजरा..
October 17, 2018
203 Views
1 Min Read

-
Share This!