मनोरंजन

वसई भोईदापाड़ा येथे नवदुर्गा सार्वजनिक महिला मंडळचा उत्सव साजरा…

# लेखक,कवी,पत्रकार सुभाष पटनाईक व मराठी सहअभिनेत्री छाया गचके यांचा विशेष सत्कार..

# वसईचे भूषण जेष्ठ समाज सेवक विजय पाटील आणि राष्ट्र्पति पुरस्कारच्या मानकरी सौ. उज्वला केणी यांची विशेष उपस्थिती…

वसई – वसई येथील भोईदापाड़ा येथे नवदुर्गा सार्वजनिक महिला मंडळच्या वतीने सालाबादाप्रमाणे नवरात्रि उत्सव साजरा करण्यात येतो.यंदाच्या वर्षी ही मोठ्या उस्ताहात नवदिवस नवरात्रि उसत्व साजरा करण्यात आला.हे महिला मंडळ गेल्या तीस वर्षापासून नवरात्रि उसत्व गुण्या-गोवींदाने साजरा करीत आहेत.
विशेष म्हणजे या मंडळाच्या वतीने परिसरातील गरजू व निराधार महिलासाठी विशेष आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी बचत गटातून सेवा कार्य केले जात आहे.
नवदुर्गा सार्वजनिक महिला मंडळाच्या अध्यक्षा व दिल्ली येथे माजी लोकसभा अध्यक्ष श्रीमती मिना कुमारी यांच्या हस्ते राष्ट्रपति पुरस्काराने सन्मानित झालेल्या सौ.उज्वला केणी यांच्या मार्गदर्शनामुळेच महिला समाज कार्य करीत आहेत.म्हणूनच स्थानिक महिलांना रिद्धि-सिद्धि महिला बचत गट,लायन्स क्लब, वसई यूनिक, पालक शिक्षक संघ,जी.जे.वर्तक विद्यालयच्या माध्यमातून महिलांना सेवा कार्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.या सर्व महिलाना वसईचे भूषण तसेच जेष्ठ समाज सेवक व नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष विजय पाटील नेहमीच आर्थिक आणि सामाजिक सहकार्य करत आले आहेत.
दरम्यान याच नवदुर्गा नवरात्रि उत्सवात विजय पाटील आणि मंडळाच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.उज्वला केणी यांच्या विशेष उपस्थितीत वरिष्ठ पत्रकार ,लेखक,कवी सुभाष पटनाईक आणि मराठी सह अभिनेत्री छाया गचके ज्यांनी मराठी सिनेमा काक:स्पर्श,टीवी सीरियल जय मल्हार या मालिकेत सरस्वतीची भूमिका निभावली आहे.यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या विशेष कार्यक्रमात शाळेतील गरीब विद्यार्था यांना शालेय साहित्याचे मान्यवरांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले.या प्रसंगी मंडळाच्या स्थानिक महिला उपाध्यक्षा ललिता पाटील, सदस्या अर्पणा पाटील, रेखा सावंत, प्रमिला बोचल, अनिता दळवी, सुनीता अंधेर तसेच वसई चे स्थानिक ग्रामस्त या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

ठाणे

ठाणे

देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हरघर तिरंगा अभियान सुरू असतानाच शहापूर तालुक्यातील आद्यक्रांतीकारी राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळांची दयनीय अवस्था ?जिल्हाधिकां-याचा सकारात्मक प्रतिसाद !

Advertisements

कोकण

नवी मुंबई

error: Content is protected !!