साहित्य

विद्या ही शेवटपर्यंत आपल्या सोबत असते, ती प्राप्त करण्यासाठी पुस्तके व ग्रंथांचे वाचन आवश्यक — साक्षी परब

डोंबिवली :– विद्या ही शेवटपर्यंत आपल्या सोबत असते, ती प्राप्त करण्यासाठी पुस्तके व ग्रंथांचे वाचन आवश्यक आहे . संत ज्ञानेश्वरानी १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, संभाजी महाराजांनी १४ व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला, त्यांना १८ भाषा येत होत्या या कर्तृत्ववान व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण वाचन केले पाहिजे असा मत  साक्षी परब यानी व्यक्त केले.

अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने १११११ पुस्तकांचे विनामूल्य वितरण डोंबिवली, ठाणे , भुसावळ , धुळे व अमरावती येथे करण्यात आले. डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून हेमंत नेहेते , साक्षी परब आणि संकेत खर्डीकर यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. डोंबिवली येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल राणाप्रताप वाचन प्रेरणा दिनाचे निमित्ताने १११११ पुस्तकांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उपक्रमाचे प्रमुख हेमंत नेहेते यांनी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग सांगितले व उपक्रमाचे प्रणेते डॉ योगेश जोशी यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम कसा साकारला हे विशद केले. उपक्रम प्रमुख संकेत खर्डीकर याने जसा शरीराच्या विकासासाठी व्यायाम आवश्यक आहे तसेच मनाच्या विकासासाठी पुस्तके वाचली पाहिजेत असे मत मांडले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ राम नेमाडे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की ” नवरात्रीत आई भवानीच्या नावाने जागर मांडतात. हा जागर नऊ दिवस चालतो.वाचन प्रेरणा दिनानिमित्तसुरू झालेला हा जागर मात्र अखंड सुरू राहिला पाहिजे. कारण ज्ञानसाधना ही एक चळवळ आहे.ती एक प्रक्रिया आहे.क्रिया लगेच थाबते. प्रक्रियेत सातत्य असावे लागते.आजच्या पिढीने बुध्याच(जाणीवपूर्वक) घेतलेले हे वाचनसंस्कृती विस्ताराचे व्रत येणा-या पिढीला सोपवायचे आहे असाही संगितिले. राष्ट्रीय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ सुभाष वाघमारे यांनी वाचन प्रेरणा दिनाविषयी बोलताना सांगितले की ” आजवर जे यशस्वी स्त्री पुरुष होऊन गेले त्यांच्या यशाचे गमक म्हणजे वाचन. त्यामुळे वाचनाची सवय लहानपणापासूनच लाऊन घेतली पाहिजे. या प्रसंगी ॲड यतीन गुजराथी, ॲड संपदा कुलकर्णी , नगरसेवक  दत्तात्रय बारटक्के , नगरसेविका कांचन चिंदरकर यांची समयोचित भाषणे झाली. उपक्रम समन्वयक डॉ राज परब , सौ ज्योती परब आणि डॉ योगेश जोशी यांच्या मार्गदर्शनातून डोंबिवली येथे ६५ शाळांना  ,संकल्प इंग्लिश स्कूल येथे ५५ शाळांमध्ये भुसावळ व धुळे येथे ४० शाळांमध्ये १११११ पुस्तकांचे विनामूल्य वितरण करण्यात आले. स्वामीविवेकानंद राणाप्रताप हायसकुलचे मुख्याध्यापक भोजराज रायसिग कायॅक्रम उपस्थित होते कायॅक्रम सुत्रसंचालन सो वषाॅ डोईफोडे आभार प्रदर्शन विजय कुमार देसले यांनी केले

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!