ठाणे

१५ दिवसात २७ गावातील दस्तनोंदणी सुरु करा अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू :  संघर्ष समितीचा इशारा ..

????????????????????????????????????

डोंबिवली :-   मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करूनहि नुसतेच आश्वासन दिले जाते. मात्र आता आम्हाला ठोस निर्णय हवा आहे. त्यामुळे संघर्षांची सुरुवात झाली आहे. रस्त्यावर उतरल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही. २७  गावचा लढा काय असतो हे आता या सरकारला  देण्याची वेळ आली आहे. आणखी दोन महिने म्हणजेच डिसेंम्बर पर्यंत वाट बघू. त्यानंतर उग्र आंदोलन छेडण्यात येईल. जर काही अनुचित प्रकार घडला तर त्याला शासन जबाबदार राहील. २७  गावांवर शासनाकडून अन्याय सुरू आहे. अनधिकृत बांधकामांच्या नावाखाली  २७  गावात रजिस्ट्रेशन  बंद केले आहे. मात्र आजूबाजूच्या गावात मात्र सुरू आहेत. याबाबत दसऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची रजिस्ट्रेशन सुरू करावे अन्यथा  १५  दिवसात रजिस्ट्रेशन सुरू झाले नाही तर सब रजिस्ट्रेशन कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी दिला.

       मानपाडेश्वर मंदिराच्या आवारात संघर्ष समितीचे घेतलेल्या जाहीर सभेत २७ गावातील ग्रोथ सेंटर, २७ गावाची स्वातंत्र नगरपालिका, मालमत्ता कर आणि दस्तनोंदणी या विषयावर पदाधिकारी आणि गावकऱ्यांनी आपली मते मांडली.सभेच्या सुरुवातीला सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी २७ गावातील गावकऱ्यांनी पालिकेत मालमत्ता कर भरू नका असे आवाहन केले. त्यानंतर कोळे गावातील विक्रम पाटील म्हणाले, या गावांत आमच्या नावावर असलेल्या जमिनीवर बांधकाम  केल्यास एमएमआरडीए अनधिकृत बांधकाम असल्याचे ठरवते. अध्यक्ष गंगाराम शेलार म्हणाले, या २७ गावासंदर्भात घेतलेल्या निर्णयाबद्दल मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पायउतार होण्याची वेळ आली होती. तशीच वेळ विद्यामान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर येऊ नये. अर्जुनबुवा चौधरी म्हणाले. आगामी निवडणुकाआधी २७ गाव स्वतंत्र नगरपालिकेचा निर्णय झाला नाही तर आगरी समाज पेटून उठेल. यानंतर उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी भाषणात राज्यातील कोणत्याही ठिकाणी दस्तनोंदणी नसून

२७ गावतील दस्तनोंदणी का बंद ? याबाबत दसऱ्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची रजिस्ट्रेशन सुरू करावे अन्यथा  १५  दिवसात रजिस्ट्रेशन सुरू झाले नाही तर सब रजिस्ट्रेशन कार्यलयाला टाळे ठोकू असा इशारा दिला. पुढे ते म्हणाले. या गावात बांधकाम करणाऱ्या विकासकांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल केले जात आहे. मानपाडा पोलीस ठाण्यात त्यांच्यावर दबाव आणून येथील पोलीस त्याच्यांकडून १ लाख रुपये मागत असल्याचा गंभीर आरोप जाहीर सभेत केला. या सभेस संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार,उपाध्यक्ष गुलाब वझे, सरचिटणीस चंद्रकांत पाटील,अर्जुनबुवा चौधरी, बळीराम तरे, दत्ता वझे यासह नगरसेविका शैलजा भोईर, दमयंती वझे आणि इंदिरा तरे उपस्थित होते.

१ ) संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांनी मानपाडा पोलिसांवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत अप्पर पोलीस आयुक्त प्रतापराव दिघावकर यांना विचारले असता ते म्हणाले, संघर्ष समितीने आमच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार द्यावी. या तक्रारीत ज्या पोलिसांवर समितीने आरोप केले आहे त्याचे नाव नमूद करावे. याबाबत तपास केला जाईल.

—————————————————————————————————————————————————————————————

२ )  ज्या अधिकाऱ्यावर भष्ट्राचाराचे आरोप झाले त्या सुनील जोशीला  पालिकेच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभागाचे उपायुक्त बनविण्यात आले. २७ गावातील बांधकाम करणाऱ्या विकासकांना नोटीस बनवतो.

ते बांधकाम तोडू नये म्हणून कलेक्शन करत असल्याचा आरोप  भूमीपुत्र बिल्डर असोशिएशनचे भास्कर पाटील यांनी जाहीर सभेत केला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!