ठाणे

कंत्राटी कामगाराच्या संपामुळे कचरा गाडीची `घंटा` वाजलीच नाही…

  डोंबिवली :- कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपाला सकाळपासून सुरुवात झाली.डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा डेपोतील कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या टायरमधील हवा काढून कर्मचाऱ्यांनी सुरू केले ठिय्या आंदोलन केले.गाड्यांची हवा काढल्याने गाड्या जागीच ठप्प झाल्या .आंदोलांकर्त्या कर्मचाऱ्यांंचा आक्रमक पवित्रा पाहून पालिका, पोलीस यंत्रणा व संबंधित ठेकेदाराची तातडीने बैठक घेण्यात आली आयुक्तांनी ठेकेदाराच्या रखडलेल्या बिलाच्या रकमेपैकी ६०  लाखाचा धनादेश तातडीने काढला. मात्र यातून कर्मचाऱ्यांचा तीन महिन्याचा पगार देणे शक्य नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र तरीही आयुक्तांच्या आश्वासनांनंतर कर्मचाऱ्यांनी दुपार नंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले. मात्र  घटागाड्यामध्ये हवा भरण्याचे काम काही तास चालल्यामुळे अनेक भागात घंटागाड्या पोहोचूशकल्या नाहीत. सकाळच्या सत्रात शहरात एकही घंटागाडी धावू शकली नसल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते.

     कल्याण-डोंबिवली महापालिकेत आधीच कचरा प्रश्न गंभीर बनला असताना आज कंत्राटी कामगारांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. ठेकेदाराच्या माध्यमातून कचरा उचलण्याचे काम करणाऱ्या य ४०० कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यापासून पगार मिळालेला नसल्यामुळे त्रस्त कर्मचर्यानी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले. त्यामुळे आज घंटागाड्या बंद होत्या .याचा सर्वत जास्त फटका डोंबिवलीला बसला या संपाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने पाठिंबा दिला आहे.दरम्यान आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी खंबाळपाडा डेपोतील कचरा उचलणाऱ्या गाड्यांच्या टायरमधील हवा काढून कर्मचाऱ्यांनी सुरू केले ठिय्या आंदोलन केले.गाड्यांची हवा काढल्यानें गाड्या जागीच ठप्प झाल्या होत्या त्यामुळे एकही घंटा गाडी बाहेर न निघू शकली नाही त्यामुळे आज सकाळच्या सत्रात शहरात एकही  घंटागाडी धावू शकली नसल्याने शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते. उद्या दसऱ्याच्या तोंडावर शहरात कचऱ्याची समस्या निर्माण झाल्यामुळे खडबडून जागे झालेल्या पालीक आयुक्तांनी तातडीने ठेकेदारांच्या रखडलेल्या बिलापैकी ६०  लाख रुपयांचा धनादेश काढण्याचे आदेश दिले. मात्र ही रक्कम अपुरी असून यामुळे कर्मचाऱ्यांना एकाच महिन्याचा पगार देत येणार असल्याचे कर्मचऱ्याचे म्हणणे आहे. मात्र कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी तातडीने दखल घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर आंदोलन मागे घेत काम सुरू केले. मात्र  घंटागाड्यामध्ये हवा भरण्याचे काम काही तास चालल्यामुळे अनेक भागात घंटागाड्या पोहोचू शकल्या नाहीत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!