क्रिडा ठाणे

विजयादशमी निमित्त सदा (मामा) पाटील प्रतिष्ठान अंबरनाथच्या वतीने “शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन”

* विजयी स्पर्धकांना सदाशिव पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सन्मानित   
अंबरनाथ :  सालाबादप्रमाणे यंदाही विजयादशमी निमित्त सदा (मामा) पाटील प्रतिष्ठान (रजि.) अंबरनाथच्या वतीने “शरीरसौष्ठ स्पर्धेचे आयोजन” अंबरनाथ नगरपरिषद व्यायाम शाळेत करण्यात आले होते. या स्पर्धेचे आयोजन शैलेश साळुंखे व राजेश दिघे यांनी केले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अंबरनाथ शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम समितीचे माजी सभापती सदाशिव (मामा) पाटील व पोलीस सुरेंद्र पवार यांच्यासह सुनील अहिरे, गणेश गायकवाड व शहरातील पत्रकार उपस्थित होते.

          हि शरीरसौष्ठ स्पर्धा ३ संघांमध्ये झाली. एका संघात ८ स्पर्धेक सहभागी झाले होते. त्यात पहिल्या संघात भरत बिफ्टा (प्रथम), अतुल सिंग (द्वितीय) व धीरज धमेंद्र तीडगे (तृतीय) विजयी झाल्याने त्यांचा सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले, तर दुसऱ्या संघातून आफताब शेख (प्रथम), नितेश दिलीप मोरे (द्वितीय), विकास पांडे (तृतीय) आणि तिसऱ्या संघातून आमिर चौधरी (प्रथम), उमेश यादव (द्वितीय), करन वळवे (तृतीय) आल्याने त्यांचा देखील यावेळी सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर “बेंच प्रेस” मध्ये अंबरनाथ नगरपरिषदेचा कर्मचारी आनंद भिवाळ (प्रथम), विकास पाल (द्वितीय) व हर्षल कांबळे (तृतीय) आल्याने त्यांचाहि सदाशिव पाटील यांच्याकडून सन्मान करण्यात आलं.
         तसेच “महाराष्ट्र श्री” मध्ये नेमणूक झाली ते अंबरनाथ नगरपरिषदचे  व्यायामपटू गणेश राऊत यांचाहि सत्कार करण्यात आला.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!