डोंबिवली : रात्रीच्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून चार चोरट्यांनी दरवाज्याचे लॅच तोडून घरात चोरी करण्याचा प्रयत्न करताना चोरट्यांपैकी एकाला रहिवाश्यांनी रंगेहात पकडून चोप देत विष्णूनगर पोलीसांच्या ताब्यात घेतले. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी उद्याजवळील मल्लार आशिष इमारतीत घडलेल्या या घटनेत चोरट्याला पकडल्यास गेलेल्या रहिवाशी प्रभाकर प्रभू यांच्या डाव्या हातावर चोरट्याने त्याच्याकडील स्क्रू ड्राव्हरनेवार हल्ला केला. मात्र सुदैवाने या हल्ल्यात त्यांना किरकोळ मार लागला. इमारतीतील रहिवाशी नितेश शेट्टी आणि तुषार शिंदे यांनी चोरट्याला पकडले होते. अटक केलेला चोरटा सराईत असून त्याच्यावर मुंबईतील धारावी आणि माहीम पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहे. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी उद्यानाजवळील स्टेट बॅक इंडिया आणि लिज्जत पापड केंद्रात चोरी केल्याचे कबूल केल्याची पोलिसांनी सांगितले.
नसीम शबीर खान ( २८) असे अटक केलेल्या चोरट्याने नाव असून तो काही दिवसांपासून डोंबिवली पूर्वेकडील भोपर गावातील स्मशानभूमीजवळील बारकू बाई चाळीत भाडेतत्वावर घरात राहत होता. सचिन कानिफनाथ आगेरे ( २५ ) यासह भरत आणि सुरज हे चोरटेहि त्याच्याच बरोबर राहत होते. गुरुवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अरविंद वैशंपायन यांच्या घरात कोणी नसल्याचे पासून या चार चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे सेफ्टी डोअरचे लॅच तोडून घरात प्रवेश करत घरातील दागिने एका बॅगेत भरत होते. इमारतीतील रहिवाशी नितेश शेट्टी हा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करून घरी जात असताना त्याला वैशंपायन यांच्या घरात आवाज एकू आला. ताबडतोब नितेशने वैशंपायन यांच्या घरातील दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करून चोरट्यांना पकडल्याचा प्रयत्न केला. मात्र त्यातील तीन चोरटे पळून गेले.इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आरडा-ओरड एकू आल्यावर तुषार शिंदे धावत आले. नितेश शेट्टी, तुषार शिंदे आणि प्रभाकर प्रभू यानी नसीमला पकडल्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या हातातील स्क्रू स्क्रू ड्राव्हरने प्रभाकर प्रभू यांच्या हातावर हल्ला केला. रहिवाश्यांनी याला चोप देत विष्णूनगर पोलिसांच्या ताब्तात दिले. दागिन्याची बँग घेऊन पळून गेलेल्या तीन चोरटे जवळील डोंबिवली पूर्वेला जोडणाऱ्या पुलावरून आप्पा दातार चौक येथून धावत असताना समोरून रामनगर पोलिसांची गाडी पाहून हातातील बँग तिथेच टाकून पळ काढला. यात पोलिसांनी सदर बँग घेऊन विष्णूनगर पोलिसांच्या हवाली केली. बँगेत खोटे सोन्याचे दागिने असल्याचे रहिवाश्यांनी सांगितले.
राहण्यास सहज घर मिळत असल्याचा चोरट्याने घेतला फायदा …
डोंबिवलीत तीन ठिकाणी चोरी करणारे हे चारही चोरटे काही दिवसांपासून भाडेतत्वाच्या घरात रहात होते. वास्तविक आपले घर ज्याला भाडेतत्वावर राहण्यास देताना त्याची माहिती व फोटो स्थानिक पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे.मात्र असे होत नसल्याने याचा फायदा चोरटे घेतात. नसीम खान हा मुळचा उत्तरप्रदेशातील बनारस जिल्ह्यातील कोटवा गावात राहतो. आपल्या राहण्यास सहज घर मिळू शकते आणि त्याची माहिती तेथील स्थानिक पोलिसांना दिली जात नाही म्हणून त्याने भाडेतत्वावर घर घेतले.