महाराष्ट्र

वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील २६ उद्योजिका सहभागी होणार

दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे 26 ऑक्टोबर रोजी उद्घाटन

नवी दिल्ली22 : केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे आयोजित‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील 26 उद्योजिका सहभागी होणार आहेत.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी दिनांक 26 ऑक्टोबरला होणार आहे.  देशभरातील 500 महिला उद्योजक या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार  आहेत.

सेंद्रीय शेती करणाऱ्या महिला शेतकरी व महिला उद्योजकांस प्रोत्साहन देण्यासाठी या मेळ्याचे आयोजन मागील चार वर्षांपासून करण्यात येत आहे. महिला उद्योजकांस योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांचे सक्षमीकरण व्हावे, महिला उद्योजकांसाठी अधिकाधिक संधीची दारे उघडावीत हा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे.

महाराष्ट्रामधून नंदुरबार(4), जळगाव(4), नागपूर(2), भंडारा(1), अमरावती(2), यवतमाळ(4), औरंगाबाद(1), हिंगोली(1), बीड (1),  तर मुंबईतून 4 उद्योजिका सहभागी होणार आहेत. यासह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसिएशन ऑफ ऑरगॅनिक फार्मर्स यांचाही सहभाग असणार आहे.

महाराष्ट्रामधून येणाऱ्या महिला उद्योजक प्रदर्शनामध्ये  डाळी, हळद, मसाले, औषधीयुक्त काळे तांदूळ, पारपरिक तांदूळ, तेलबिया, केळीचे चिप्स, लोणची, नागलीचे विविध खाद्य पदार्थ, चिक्की, बेसनाचे लाडू   अंबाडी, फुले, गवती चहा, तरोटा कॉफी, बेबी बॉडी वॉश, बॉडी क्रिम, लीप बाम, मालिश तेल, हॅन्डवॉश, असे विविध वस्तू तसेच पदार्थ येथे विक्रीसाठी प्रदर्शित केले जाणार आहेत. हे प्रदर्शन 4 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!