डोंबिवली :- कलेचे हब म्हणुन ओळखल्या जाणा-या व सर्जनात्मक दृककलेचे प्रशिक्षण देणा-या श्रीकला अँकेडमीचे शानदार उदघाटन अक्षर रचनाकार राज कांदलकर यांच्या हस्ते नुकतेच झाले.डोंबिवली पश्चिम येथे हि अॅॅकेडमी सुरु करण्यात आली आहे. शरद ऋतूच्या निमित्ताने उदघाटना झाल्यानंतर विविध कलांचे प्रदर्शन संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आले होते.छायाचित्रण, ऐतिहासिक नाणी व व्यंगचित्रांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. या प्रदर्शनाला उंदड प्रतिसाद लाभला.२१ ते २३ ऑक्टोबर २०१८ असे तीन दिवस हे प्रदर्शन सुरु असून विनामुल्य प्रवेश आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील भाऊराव सदन, देवदत्त सुपर मार्केटसमोर, सुभाष क्रॉस रोड येथे या नूतन श्री कला अॅॅकेडमीचे सुरुवात करण्यात आली. याबाबत संस्थेचे कलाशिक्षक अजिंक्य बेर्डे म्हणाले,डोंबिवलीतील विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यातील परिपूर्ण कलाकार निर्माण व्हावे हा संस्थेचा मुख्य उद्देश असून याचा उद्देशाने संस्थेची स्थापना केली आहे.प्राथमिक शिक्षण ते कलेतील उच्च शिक्षणापर्यतचे हब ( केंद्र ) व्हावे तसेच कलाशिक्षण व कलेला प्रोत्साहन आणि कलेचा प्रचार व्हावा यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली. संस्थेच्या उद्घाटननिमित्ताने रंगीत आणि कृष्ण धवल छायाचित्र, व्यंगचित्र, ऐतिहासिक व देशविदेशातील दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले.या प्रदर्शनात १२४ छायाचित्रे, १६ व्यंगचत्रे आणि ३२५ देशविदेशातील दुर्मिळ नाणी आणि ४८ ऐतिहासिक नाणी आहेत. श्री कला अॅकेडमी प्रमुख मंगेश वेल्हे हे एलिमेंटरी व इटरमिजिएट या परीक्षाचे प्रशिक्षक आहेत. त्याचप्रमाणे अजिंक्य बेर्डे व जयवर्धन सूर्यवंशी हे छायाचित्रण व कलेबाबत प्रशिक्षण देतात. डोंबिवलीत प्राथमिक स्तरावर कलेचा आभाव असल्याने चित्रकला हा विषय इतर विषयांप्रमाणे महत्व दिले जात नाही. त्यामुळे ज्यांना चित्रकला या विषयावर गती असताना सुद्धा प्राथमिक स्तरावरचे शिक्षण मिळत नाही. काही शाळामध्ये तर चित्रकला शिक्षकच नसतात असे दिनेश सावंत म्हणाले,