पनवेल / वार्ताहर : खालापूर येथील नढाळ आदिवासी पाड्यातून सराईत गुन्हेगार फय्याज शेखला अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. अनेक महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु दोनदा तो पोलिसांवर गोळीबार करून पळाला होता. अखेर शनिवारी तो पोलिसांच्या हाती लागला. फय्याज शेखला पकडण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला होता. यावेळी त्याने पोलिसांवर गोळी झाडून पळण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान प्रती उत्तर म्हणून पोलिसांनी देखील फायरिंग सुरू केली. या चकमकीत पोलिसांनी झाडलेली गोळी गुंड फय्याज शेखच्या पायावर लागल्याने तो जखमी झाला आणि पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या विरोधात राज्यभर 81 गुन्हे दाखल असून त्यापैकी 58 गुन्हे नवी मुंबईत दाखल आहेत. सतत राहण्याची ठिकाणे बदलून व वेशभूषा बदलून पोलिसांना तो चकमा देत होता. चार दिवसांपूर्वी देखील त्याने वसई येथे नवी मुंबई पोलिसांवर गोळीबार करून पळ काढला होता.
नवी मुंबई पोलिसांना अनेक वर्षांपासून अट्टल साखळी चोर फैयाज शेख हा हवा होता. नवी मुंबईत त्याने तब्बल ५५ साखळी चोरी केली होती. हे गुन्हे करीत असताना अनेक ठिकाणी तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. हाच फैयाज याने खारघर येथे साखळी चोरी केल्याचे ‘सीसीटीव्ही’तून समोर आले.
नवी मुंबईतील कुख्यात गुंड फय्याज शेखला अटक करू पुहा एकदा नवी मुंबई पोलिसाच्या कामगिरीची सर्व स्तरातून वाहवा होत आहे. पोलीस निरीक्षक विजय कादबाने, शिरीष पवार, संदीप शिदे तसेच तळोजा पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे याच्या धडाकेंबाज कामगिरीला सलाम !