ठाणे

वासींद येथे महाआरोग्य शिबीर संपन्न

ठाणे : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संस्थापक निलेशजी भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून एसएमबीटी व भक्ती वेदांत हॉस्पिटल व भैरव हॉस्पिटल भिवंडी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२१ ऑक्टोबर २०१८ रोजी सरस्वती विद्यालय वासींद येथे मोफत सर्वरोग तपासणी व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एसएमबीटी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉक्टरांच्या टीमने ह्रदयरोग, मधुमेह व उच्च रक्तदाब, अस्थिरोग, बालरोग, स्त्रीरोग, मनके विकार व मेंदूरोग, मुतखडा व किडनी विकार, नेत्र तपासणी, दंतरोग, जनरल तपासणी आदीबाबत उपस्थित रुग्णांची तपासणी केली.
तसेंच मोफत औषधे वाटप करण्यात आली.

या महाआरोग्य शिबिरात १६३० रुग्णांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली.त्यामध्ये ३७ रुग्णाची 2 D-ECHO तपासणी करण्यात आली व ६९ रुग्णाना एसएमबीटी व भक्तीवेदांत हॉस्पिटल मध्ये मोफत ऑपरेशन करण्यासाठी आज पाठवण्यात आले.

दरम्यान, ग्रामीण भागातील कोणताच रुग्ण उपचाराविना दगावू नये’ हे स्वप्नं उराशी बाळगून ठाणे-पालघर जिल्ह्यात विविध आरोग्यविषयक उपक्रम हाती घेऊन १५० शिबिरे राबविण्यात येणार असल्याचे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले.

त्याच माध्यमातून वासींद येथे हे आरोग्य शिबीर ठेवण्यात आलं आहे, यापुढेही सामाजिक कार्य अश्याच प्रकारे चालू राहणार असल्याचं निलेश सांबरे यांनी सांगितलं.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणू अपर्णाताई खाडे, नरेश आकरे, रवींद्रजी खुताडे, मनीष काठोले, वासुदेव काठोले, दामोदरे सर, भास्कर देसले व सर्व पत्रकार बंधू आवर्जून उपस्थित होते.

एसएमबीटी हॉस्पिटल, भक्तीवेदांत हॉस्पिटल, भैरव आय हॉस्पिटल, सरस्वती विद्यालय, ग्रामीण रुग्णालय वासींद यांचे महा आरोग्य शिबीराला विशेष सहकार्य लाभले

सदर, या महा आरोग्य शिबिरासाठी जिजाऊ टीम ने विशेष मेहनत घेतली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!