# हावरे पिनँकल स्वप्नपुर्ति सोहळा…
# २५ वर्षात ४१ हजार मध्यमवर्गी लोकांना हावरे ग्रुप ने घरे दिली…!
# कल्याणच्या बापगावात हावरे यांच्या घरांच्या प्रकल्पाचा शुभारंभ
कल्याण – आपल्या शहरात आता स्मार्ट सिटी होणार आहे;पण मला स्मार्ट सिटी पेक्षा,स्मार्ट व्हीलेज साकार करण्याचे माझे स्वप्न आहे.गेल्या तीन वर्षात पाहिलेल स्वप्न मी या ग्रामपंचायतीच्या बापगावात स्वप्न पाहिले स्वप्न साकार केल आहे.असे गौरवशाली उद्द्गार श्री. शिर्डी संस्थानचे विद्यमान अध्यक्ष व हावरे ग्रुपचे सर्वेसर्वा ,विकासक सुरेश हावरे यांनी हावरे पिंनेकल शुभारंभ सोहळ्या प्रसगी काढले..
कल्याण येथील गेल्या तीन वर्षा पासून हावरे पिंनेकल ग्रुपचे मध्यम वर्गासाठी घरांचे प्रकल्प सुरु होते.रविवारी सामाजिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील व भाजपा खासदार कपिल पाटील यांच्या विशेष उपस्थितीत हा भव्य-दिव्य सोहळा पार पडला.
सुरेश हावरे म्हणाले चंद्रकांत दादा सारखे नेतृत्व आपल्या महाराष्ट्र मध्ये उभा आहे.समाजाला आपले आयुष्य त्यांनी समर्पित केले आहे.ते गिर णगावातील एका गिरणी कामगाराचे मुलगा आहे.आज घराँची जाणीव असलेला समर्पित नेतृत्व आज आपल्या या कार्यक्रमाला लाभले आहेत.मी हे खरोखर माझे भाग्य समजतो.तसेच आपले ही भाग्य आहे.अशा घराँची जाणीव असलेल्या माणसाच्या हातून घराँची चावी मिळते हे ही तुमचे भाग्य आहे.
लोकांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की,हावरे यांचे दोन्ही पुत्र अमित आणि अमर या दोघांची ही पाहिली स्किम आहे.म्हणूनच हावरे पिंनेकलच्या समारंभात मी मुद्दामच हजर राहिलो.४.५० कोटी स्केअर फिट हावरेच्या नावाने बांधकाम क्षेत्रात एक विश्वास निर्माण झाला आहे.ते म्हणाले की मी मुंबईत जन्माला आलो.८ बाय १० च्या म्हणजे ८० स्केअर फिट घरात मी आई-वडिलांनी भावंडा सोबत कुटुंबासोबत राहत होतो.लहानपणी कसे दिवस काढले हे आम्हालाच माहित.घराचा प्रकल्प पूर्ण होत आहे.तेथे आपण गेलेच पाहिजे.आणि या सामान्याच्या आनंदाला आपण सहभागी झाले पाहिजे.असे ते म्हणाले..
मुंबई सिद्धार्थ कॉलेज येथे वयाच्या विसाव्या वर्षी बीकॉम केल. संघटनेसाठी घर सोडल. आणि वयाच्या ३१ व्या वर्षी पुन्हा घरी आलो.हे आपल घर येवडूस येथे मी कसा राहु शकतो म्हणून कोल्हापुरात गावी सटल झालो.त्यावेळी हावरे मला सापडले असते तर कदाचित मुंबईला ही माझे एक हक्काचे घर असते.ते म्हणाले की खासदार कपिल पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितल्या प्रमाणे जर,खासदार-आमदार कोटयात आम्हाला घर मिळत असेल तर मी मुंबईत राहायला नक्की येईल असे चंद्रकांत दादा गमतीने हावरे यांना उद्देशुन म्हणाले…
या हावरेच्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील ,खासदार कपिल पाटील, आमदार किसन क कथोरे, हावरे ग्रुपचे सुरेश हावरे ,संजय हावरे, अमित हावरे,अमर हावरे,संतोष भामरे,सुभाष भामरे आदि मान्यवर व्यासपीठावर आवर्जून उपस्थितीत होते. चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपल्या कष्टाच्या घराँची स्वप्न पाहणाऱ्यांना हक्कच्या घराँची चावी सुपुर्द करण्यात आली.