पालघर: पालघर जिल्ह्यामध्ये बाल मृत्यू आणि माता मृत्यू दारात लक्षणीय घट झाली असून आरोग्य सोयीसुविधा सुधारण्यासाठी शासनाचे विशेष प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मा. श्री. दीपक सावंत यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा मार्फत आयोजित सातपाटी प्रथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्र सागरी क्षेत्रात वसलेले असून सदर प्रा.आ. केंद्राची स्थापना १९८४ मध्ये जिल्हा परिषदे मार्फत झाली.सातपाटी अंतर्गत १२ गावे असून एकून ११ ग्राम पंचायती आहेत. तसेच या प्रा.आ. केंद्रा एकून ६३ मंजूर पदे असून ५० पदे भरलेली आहेत. या प्रा.आ. केंद्राचे एकून क्षेत्रफळ ६५९.७४ चौ. मि. असून यासाठी रु. १०२.५३ लक्ष खर्च करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात मनोर ट्रॉमा केअर सेंटर, कासा रुग्णालय, वाणगाव आरोग्य केंद्र, चिंचणी आरोग्य केंद्र आदि कामे सुरु करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असून जिल्ह्यात मुलभूत आरोग्य सेवा देण्याबरोबरच आधुनिक आरोग्य सेवा उभारण्याच्या दृष्टीने कार्य सुरु आहे. तसेच पालघर जिल्ह्यात वैदकीय महाविद्यालय उभारनणीसाठी आवशक ते सर्व सहकार्य करण्यात येईल असे आरोग्य मंत्री यांनी यावेळी सांगितले.
यावेळी पालघर जिल्ह्याचे खासदार मा.श्री.राजेंद्र गावित यांनी पालघर जिल्ह्याच्या आरोग्य सोयीसुविधा सुधारण्यासाठी सर्व शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि वेळोवेळी हे अविरतपणे मांडणारे सर्व प्रसार मध्यम यांचे आभार व्यक्त करत पालघर सारख्या आदिवासी आणि अति दुर्गम भागात सामान्य जनतेच्या अपेक्षा व्यक्त केल्या व त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नमूद केले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. विजय खरपडे यांनी पालघर जिल्ह्यात बहुतांश जनता आरोग्य सोयीसुविधासाठी शासकीय यंत्रणेवर अवलंबून असते अश्यावेळी तत्पर सेवा देण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणांनी संवेदनशीलतेणे काम करावे व रुग्णांना परिपूर्ण आरोग्य सेवा देण्यास प्राधान्य द्यावे असे यावेळी सांगितले.
आरोग्य व बांधकाम सभापती मा.श्री.दामोदर पाटील यांनी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांची आरोग्य मंत्री यांनी वेळोवेळी दाखल घेतल्या बदल आभार व्यक्त केले व पालघर जिल्ह्याला नेहेमीच प्राधान्य देल्याचे सांगितले. आरोग्य मंत्री यांच्या सहकार्याने पालघर जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक प्रभावीपणे कार्यशील झालेचे हि यावेळी सांगितले.
पालघर जिल्हात कुपोषण निर्मुलनाच्या कार्यात आरोग्य मंत्री यांचा सिंहाचा वाटा आहे व त्यांनी केलल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलस्वरूप आज पालघरचे कुपोषण मुक्तीकडे चालेली वाटचाल अधिक गतमान झाली आहे असे मत यावेळी पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. मिलिंद बोरीकर यांनी व्यक्त केले. तसेच प्रा. आ. केंद्राचे रक्त पदे भरण्यासाठी जि. प. च्या सेस फंडातून ४८ पदे भरण्यात आल्याचे सांगतले.
प्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षमा.श्री. निलेश गंधे, मा.सभापती श्री.अशोक वडे, श्रीम.धनश्री चौधरी, श्रीम.दर्शना दुमाडा, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दयानंद सूर्यवंशी, मा.जिल्हा शल्य चिकित्सक श्रीम.कांचन वानेरे, पालघर पंचायत समितीच्या मा.सभापती श्रीम.मनीषा पिंपळे, जि. प. च्या आरोग्य समितीचे सन्मा.सदस्य श्रीम.रंजना संखे, श्रम.विपुला सावे, बांधकाम समितीचे मा.सदस्य श्रीम.नीता पाटील, पालघर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मेघन पाटील, सातपाटी गावचे सरपंच अरविंद पाटील, ग्राम पंचायत सदस्य आदि लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन पालघरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित खंदारे यांनी केले.
आरोग्य मंत्री यांनी दिलेली काही महत्वाचे मुदे:
• पालघर जिल्ह्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांचे नियोजन करून सर्व आरोग्य केंद्रात आवशक मनुष्य बळ देण्यावर भर.
• जिल्ह्यात मुबलक औषध साठा आहे.
• खाजगी वैदकीय शक्षेत्रातील तज्ञां मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा मिळविण्यासाठी प्रयत्न.