मुरबाड:काही जणांना दृष्टी असूनही त्यांना फारसे काही करता येत नाही. मात्र संपूर्ण आयुष्य अचानक अधत्व येऊनही या काळोखी जीवनात वयाची 70 वर्ष आपल्या कडे असणाऱ्या कलांच्या माध्यमातून लोकांना हवेहवेसे वाटणारे खेवारे गावाचे हरिचंद्र (अण्णा) सुरोशे यांची 19 ऑक्टोबरला अखेर प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात एक 12 वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे.
खेवारे गावाच्या हरिचंद्र घुटजी सुरोशे यांना वयाच्या 10 व्या वर्षीच अंधत्व आले आणि प्रकाशित जीवनात अंधकार पसरला.मात्र अण्णा सुरोशे हे न डगमगता आपल्या आयुष्याचा प्रवास करू लागला.काळोख्या दुनियेत लहानपणीच पितृक्षत्र हरपले.त्यानंतर त्यांच्या वर दुःखाचा डोंगर कोसळला.आपल्या आई सोबत जीवन जगत असताना पुढील काळात ते स्थानिक पातळीवर भजन त्यांच प्रमाणे देवीच गाणं गाऊ लागल्याने ते परिसरात प्रसिद्ध झाले.त्यांना ती आवडच होती.त्याच बरोबर दोरखंड बनविणे.यात त्यांचा हातखंडा होता.आई वृद्ध असल्याने आईच्या सांगण्या वरून वयाच्या 40 वर्षात त्यांनी लग्न करून आपल्या संसाराची नवीन सुरुवात केली.हळूहळू अंधाऱ्या जीवनात त्यांनी सुखाची सुरुवात केली.त्यानंतर त्यांना एक वावंशाचा दिवा झाला आणि कुटुंब प्रकाशित झाले.संपूर्ण आयुष्य दृष्टीहीन असूनही दृष्टी असलेल्याना लाजवतील अशी वागणूक करणारे हरिचंद्र (अण्णा) सुरोशे यांचे 19 ऑक्टोबरला प्राणज्योत मावळली आणि खेवारे गावचे जिगरबाज अण्णा सर्वांना सोडून गेले.त्यांच्या या जाण्याने खेवारे गावातील एक कलाकार हरपल्याच्या भावना ग्रामस्थांन कडून व्यक्त होत आहेत.