मुंबई, दि. 26 : रायगड जिल्ह्यात उभारल्या जाणाऱ्या तसेच अस्तित्वात असलेल्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळावा, असे निर्देश अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. रायगड जिल्ह्यातील कामगारांच्या प्रश्नांसंबधी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीत प्रामुख्याने पंचामृत डेअरी या संस्थेत स्थानिकांना डावलून सुमारे सव्वाशे कामगार बाहेरून भरण्यात आल्याबाबत तसेच असाही ग्लास या कंपनीतील 50 स्थानिक कामगारांना नोकरीतून कमी केल्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील कामगारांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.