ठाणे

अंबरनाथकरांना “भव्य शैक्षणिक सुविधा केंद्र” तसेच “एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भवनाच्या” पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ

अंबरनाथ दि. २९  अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील वॉर्ड क्रं. ४४ मध्ये कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने अंबरनाथकरांना मिळणार “भव्य शैक्षणिक सुविधा केंद्र” तसेच “एमपीएससी व यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भवनाच्या” पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ खासदार श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले.
         वॉर्ड क्रं.४४ मधील आरक्षण क्रमांक १२१ हे भूखंड शैक्षणिक सोयी सुविधा व खेळाचे मैदानाकरिता आरक्षित होते. हि जागा महाराष्ट्र शासनाच्या डी. डी. स्कीम १५ अंतर्गत ताब्यात होती. सदर ६३ गुंठे जागा अंबरनाथ नगरपालिकेच्या ताब्यात अधिकृतपणे घेण्यासाठी येथील स्थानिक नगरसेवक सुभाष नारायण साळुंके हे गेल्या २-३ वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत होते. याकरीता आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ नगरपालिकेचे माध्यमातून तहसीलदार कार्यालय, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच कोकण विभागीय आयुक्त कार्यालय यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे साळुंके यांनी सांगितले.
          ह्या जागेमध्ये भव्य शैक्षणिक सुविधा देणारी इमारत व खेळाचे मैदान विकसित व्हावे, याकरिता खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या माध्यमातून शासकीय निधी प्राप्त करण्यासाठी पाठपुरावा चालू होता. त्यात ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन भवन व्हावे ही संकल्पना येथील स्थानिक नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मांडली होती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सुवर्ण जयंती नगरोत्थान जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ३ कोटी ११ लाख रुपयाचा निधी मंजूर करून घेतला.अंबरनाथकरांना सुसज्ज अशी शैक्षणिक सोयी सुविधा इमारतीच्या “पायाभरणीच्या कामाचा शुभारंभ” खासदार डा‌ॅ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते नुकताच पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नगराध्यक्षा सौ. मनीषाताई वाळेकर यांनी स्वीकारलं होते. तर या कार्यक्रमाला जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार डाॅ.बालाजी किणीकर, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहर प्रमुख अरविंद वाळेकर, उपनगराध्यक्ष अब्दुलभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आदी उपस्थित होते.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!