ठाणे

भारिप बहुजन महासंघाच्या कार्यालयाचे उदघाटन ; अनेकांनी केला भारिपमध्ये प्रवेश

अंबरनाथ दि. २९    अंबरनाथ शहरात भारिप बहुजन महासंघाच्या “पक्ष कार्यालयाचा उद्धाटन समारंभ व नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा” कार्यक्रम अंबरनाथ पश्चिमेकडील कल्याण-बदलापूर रस्त्यालगत असणाऱ्या भारिपच्या जनसंपर्क कार्यालय याठिकाणी करण्यात आले होते. पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन शेषराव वाघमारे, अंकुश बचुटे व सारंग थोरात यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान बहुजन विकास आघाडीचे शहर अध्यक्ष ऍड. संदीप पगारे यांनी भारिपमध्ये जाहीर प्रवेश केला.
           याप्रसंगी अंबरनाथ शहराध्यक्ष अविनाश गाडे, शिवाजी फुले-शाहू-आंबेडकर संघटनेचे प्रमुख धनंजय सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व ठाणे जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            जिल्ह्यात हा कार्यक्रम सर्वात मोठा असल्याने अंबरनाथ शहर भारीपमय झाले होते. आंबेडकर चळवळीतील प्रमुख व कार्यकर्त्यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश घेतल्याने राजकारणात नवीन कलाटणी मिळाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच शिवाजी फुले-शाहू-आंबेडकर संघटनेचे प्रमुख धनंजय सुर्वे यांनी पक्षात प्रवेश घेतल्यानंतर पक्षात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू झालेली असल्याचे शहराध्यक्ष अविनाश गाडे यांनी सांगितले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!