ठाणे

शहापूर तालुक्यातील मुगाव-अस्नोली येथे जिजाऊ संस्थेचे मोफत आरोग्य शिबीर संपन्न..

शहापूर :दिनांक २७ ऑक्टोबर २०१८ रोजी शहापूर तालुक्यातील मौजे अस्नोली (मुगाव) येथे मोठ्या उपस्थितीत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे आरोग्य शिबीर संपन्न झाले, यावेळी अस्नोली (मुगाव) परिसरातील सुमारे ८१५ रुग्णांची विविध आजाराची मोफत तपासणी करण्यात आली. त्यामाध्यमातून ७९ रुग्णांचे डोळ्यांचे व इतर आजारांचे ऑपरेशन करण्यात येणार आहेत. १७४ गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या आरोग्य शिबिराच्या वेळी  भारतीताई ठोंबरे (सरपंच)  अनिताताई निपुर्ते, विलासजी फर्डे सर,  विशे सर,  रामचंद्रजी निपुर्ते, गणेशजी चौधरी व आदी प्रमुख मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

वरील सर्व मान्यवरांनी . श्री निलेश सांबरे यांचे आभार मानले. जे कार्य खासदार आमदारांनी कारायला पाहिजेत ते कार्य निलेशजी सांबरे कोणतेही पद नसतांना निःस्वार्थपणे करत आहेत, असंच कार्य त्यांच्या माध्यमातून चालू राहावे नक्कीच ठाणे-पालघर जिल्ह्यातील जनता-सुख समाधानाने जगेल अशी आशा मान्यवरांनी केली..

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!