मुंबई : लाच देऊ नका! लाच घेऊ नका! कोणतेही शासकीय कार्यालय असो वा खाजगी… कोणी कामासाठी पैसे (लाच) मागत असल्यास तात्काळ टोल फ्री क्रमांक “1064” वर संपर्क साधा. भारत देश भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सालाबाद प्रमाणे याही वर्षी लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे (मुंबई) 29 ऑक्टोबर ते 3 2018 नोव्हेंबरदरम्यान जनजागृतीपर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहाच्या पहिल्या दिनी अर्थात 29 ऑक्टोबर रोजी कुर्ला पश्चिम, घाटकोपर पश्चिम व मुलुंड पश्चिम रेल्वेस्थानकाबाहेर पथनाट्यादेवारे जनजागृती करण्यात आली. या पथनाट्याने अनेक नागरिकांचे लक्ष वेधले. शेकडा नागरिकांना यावेळी 1064 या टोल फ्री क्रमांकाची माहिती देण्यात आली. यावेळी भ्रष्टाचारविरुद्ध जनजागृतीची माहिती पत्रांचे वाटप करण्यात आले.
या सप्ताहादरम्यान 30 ऑक्टोबर 2018 रोजी अंधेरी रेल्वे स्थानक, दिंडोशी कोर्ट, बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानक येथे जनजागृती केली जाणार आहे.
31 ऑक्टोबर रोजी मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालय, माजगाव सेल्स टॅक्स कार्यालय येथे जनजागृती केली जाणार आहे.
1 नोव्हेंबर रोजी चर्चगेट रेल्वे स्थानक, दादर रेल्वे स्थानक, वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक येथे जनजागृती केली जाईल.
2 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, महापालिका मुख्य कार्यालय, काळा घोडा येथे जनजागृती करून या सप्ताहाची सांगता केली जाणार आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक मुंबई विभागातर्फे आयोजित केलेला जनजागृती सप्ताह सहाय्यक पोलीस आयुक्त निलम वावळ, सहाय्यक पोलीस आयुक्त अलका देशमुख, पोलीस निरीक्षक यादव यांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणार आहे.