डोंबिवली :- डोंबिवलीच्या खंबाळपाडा परिसरात ड्रेनेज साफ करण्यासाठी उतरलेल्या ३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याण पूर्वेतही काहीसा असाच भयानक प्रकार घडला आहे. सांडपाणी मिश्रित विहीर साफ करण्यासाठी उतरलेल्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तीही बुडाल्या. तर त्यांना वाचवण्यासाठी या विहिरीत उतरलेले अग्निशमन दलाचे २ कर्मचारीही बुडाल्याने खळबळ उडाली आहे. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात असणाऱ्या मंदिराजवळ ही विहीर आहे. या विहिरीच्या सफाईसाठी दुपारी एक खासगी इसम उतरला होता. तो बऱ्याच वेळ होऊनही वर न आल्याने तिकडच्या परिसरातील एक जण या विहिरीत उतरला. मात्र सफाई कर्मचाऱ्यापाठोपाठ ही व्यक्तीही बाहेर न आल्याने तिसरा इसम विहिरीत उतरला आणि तोपण विहिरीत बेपत्ता झाला. तोपर्यंत महापालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यातील एक अग्निशमन कर्मचारी विहिरीत उतरत असताना भयंकर विषारी गॅसमुले त्याला चक्कर आली आणि तो खाली विहिरीत पडला. तो पडत असताना पाहून अग्निशमन दलाच्या आणखी एका कर्मचारी धाव घेत विहिरीत उतरला. मात्र तोही विहिरीतील विषारी वायूमुळे आतमध्ये पडला. परंतु बराच वेळ होऊनही त्यापैकी एकही जण वर न आल्याने एकच गोंधळ उडाला. घटनेचे गांभिर्य ओळखून अग्निशमन दलाने तातडीने शोध आणि बचाव कार्य सुरू केले आहे.
कल्याण पूर्वेतील सांडपाणी मिश्रित विहिरीत ५ जण बुडाले …
November 1, 2018
51 Views
1 Min Read

-
Share This!