डोंबिवली :- कल्याण तालुक्तातील पिपंरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावात शासनाने लावलेल्या जिझिया लागू केल्याने गावकरी वैतागले आहेत.शुक्रवारी भरविलेल्या विशेष ग्राम सभेत करबाबतचा विषय आल्यावर गावकऱ्यांनी वाढीव कर भरण्यास एकमताने विरोध केला. यावर ग्रामसेवक तुषार तुषार पाटील यांनी सदर प्रस्ताव शास्नानाकडे पाठविला जाईल असे सभेत सांगितले. या सभेत ४ कोटी ८ लाख रुपयांचे मूळ अंदाजपत्रका सादर करण्यात आले.
या विशेष सभेत सपना येंदारकर, उपसरपंच फिनोद पाटील, माजीसरपंच माधव जाधव यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी उपस्थित होते. पिंपरी खोतबंगला ठाकूर पाडा, कर्म नगरी येथील ग्रामस्थांना शहरातील रेडी रेकनरप्रमाणे कर आकारणी करण्याचा महसूल खात्याने घेतलेल्या निर्णयामुळे येथील ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. या ग्रामस्थांनी ग्रामसभेत याला कडाडून विरोध करीत कर न भरण्याचा निर्णय घेतला.या सभेत ग्रामसभेला ग्रामस्थानी प्रचंड गर्दी केली होती.य सभेत मूळ अंदाजपत्रक ग्रामसेवक पाटील यांनी सादर केले. कराच्या विषयास सुरुवात करताच ग्रामस्थानी आम्ही कर भरणार नाहीअसे ठणकावून सांगितले. २०१५ साली शासनाने अधिसूचने द्वारे पिंपरी खोतबंगला ठाकूर पाडा, कर्म नगरी येथील विविध करात कर वाढ केली.अत्यंत जाचक कर वाढ केल्याने गेली चार वर्ष या गावातील ग्रामस्थानी कर भरणे बंद केले आहे.या गावात साडेपाचशे घरे असून सतराशे गोडाउन आहेत. नवी मुंबई , कल्याण डोंबिवली शहरातील रेडी रेकनरप्रमाणे कर आकारणी महसूल विभागाकडून करण्यात आली आहे. या विरोधात संघर्ष सुरु असून खा. डाँ श्रीकांत शिंदे यांच्या कडे महसूल खात्याच्या अन्यायाबाबत तक्रा