ठाणे : 1 नोव्हेंबर 2018 रोजी कळवा परिसरातून बेपत्ता झालेल्या 7 वर्षीय मुलीचा अवघ्या 12 तासांता शोध लावण्यात आला. ही धडाकोबाज कामगिरी कळवा पोलिसांनी केली आहे. बेपत्ता मुलीला दिवाळीनिमित्त नवीन ड्रेस देऊन तिला बहिणीच्या ताब्यात पोलिसांनी दिले.
कळवा परिसरा राहणारी 7 वर्षीय वैष्णवी सागवेकर ही 1 नोव्हेंबर 2018 रोजी अचानक बेपत्ता झाली. तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती सापडली नाही. अखेर 2 नोव्हेंबर 2018 रोजी मध्यरात्री 12:50 वाजता कळवा पोलिसांनी (गु. र. क्र. 412/18) भादंवि कलम 363 नुसार नोंद केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची 4 पथके नेमण्यात आली. या पथकाने मुलगी राहत असलेल्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच खबऱ्यांनाही वैष्णवीची माहिती दिली. तपास सुरू असताना वैष्णवी मानखुर्द येथील बाल सुरक्षा गृहात असलेल्याची माहिती मिळाली.
कुर्ला रेल्वे स्थानकात वैष्णवी रडत असताना सुजाण नागरिकांना दिसली. सदर माहिती लोहमार्ग पोलिसांना देताच त्यांनी मुलीला मानखुर्द येथील बाल सुरक्षा गृहात ठेवले. कळवा पोलिसांना तात्काळ तेथे जाऊन वैष्णवीला ताब्यात घेतले. वैष्णवीला दिवाळी सणानिमित्त नवीन ड्रेस दिला आणि तिला बहिण पूजा हिच्या ताब्यात दिले.
ही धडाकेबाज कामगिरी ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सह पोलीस आयुक्त मधुकर पाण्ड्ये, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे अन्वेषण) प्रवीण पवार, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) केशव पाटील, अपर पोलीस आयुक्त( पश्चिम प्रादेशिक विभाग) सत्यनारायण, परिमंडळ 1 चे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त (कळवा विभाग) रमेश धुमाळ यांच्या मार्गर्शनाखाली कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोनि प्रशा पवळे, पोनि (गुन्हे) अशोक उतेकर, पोउनि संजय पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.