* साडेपाच हजारापेक्षा जास्त नागरिकांनी घेतला लाभ
* शहर प्रभारी सुनील सोनी यांनी दिली माहिती
अंबरनाथ दि. ०२ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने दिवाळी निमित्त “स्वस्त दरात फराळ साहित्य वाटपाचा” कार्यक्रम अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन अंबरनाथ शहर प्रभारी तथा नगरसेवक सुनील सोनी यांनी केले होते, तर या कार्यक्रमाचे संयोजक शहराध्यक्ष भरत फुलोरे व अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष याकूब सय्यद हे होते. कार्यक्रमाची सुरुवात भाजपाचे प्रदेश सचिव तथा आमदार नरेंद्र पवार यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दरम्यान सुमारे साडेपाच हजार नागरिकांना या फराळ साहित्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती आयोजक सुनील सोनी यांनी दिली.
रवा १ किलो, मैदा १ किलो, साखर १ किलो, पामतेल १ किलो, पोहे १ किलो आदी वस्तूंचे एकूण २८२/- रुपये होतात. हेच वस्तू भाजपच्या वतीने अवघ्या ५० रुपयात देण्यात आल्याने शहरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली होती. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश सचिव तथा मुरबाडचे आमदार किसन कथोरे, माजी मंत्री जगनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष मनोज कांदोई, राजेश कौठाळे, नगरसेवक तुळशीराम चौधरी, नगरसेविका अनिता आदक, शहराध्यक्ष भरत फुलोरे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या हस्ते हि फराळ साहित्यांचे वाटप करण्यात आल्याचेहि सुनील सोनी यांनी सांगितले.