डोंबिवली :- डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ मार्गावरील कै.पदू म्हात्रे चौकात आयोजित केलेल्या दिवाळी पहाटचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. माजी नगरसेविका तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सदस्या रत्नप्रभा भास्कर म्हात्रे आणि युवक कॉंग्रेस डोंबिवली विधानसभा सचिव अमित म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या दिवाळी पहाटमध्ये २ वर्षाची स्वर गावडे आणि ६६ वर्षाच्या वर्षा चौधरी यांनी याठिकाणी काढलेल्या सेल्फीला पारितोषिके देण्यात आली. तर एक सोसायटी एक रांगोळी स्पर्धेत पहिला क्रमांक शास्त्रीनगर परिसरातील शिवा आकांक्षा सोसायटी, दुसरा क्रमांक पॅनोरम सोसायटीला आणि तिसरा क्रमांक तुळशीराम जोशी चाळीला देण्यात आले. यावेळी काही अंध व्यक्तींचाही खास सत्कार करण्यात आला. मराठी कलाकारांचा वाद्यवृंद कार्यक्रम करण्यात आला होता. विशेष म्हणजे आयोजक अमित म्हात्रे यांनी अंध व्यक्तीबरोबर सेल्फी पाॅईटवर सेल्फी काढली. यावेळी तरुणाईनेही गर्दी केली होती.पारांपारीक वेषात महिलांनी याठिकाणी हजेरी लावली होती.
डोंबिवली पश्चिमेकडील दिवाळी पहाटमध्ये ६६ वर्षीय आजीचा सेल्फी….
November 6, 2018
57 Views
1 Min Read

-
Share This!