डोंबिवली : गांधीनगर मित्र मंडळ या मंडळाची स्थापना तीन महिन्यापूर्वी करण्यात आली. या मंडळाने दहिकाला उत्सव मोठ्या दणक्यात साजरा केला होता. या उत्सवाला मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद पाहून मंडळाचा अध्यक्ष प्रतिक पाटील व त्याच्या सवंगड्यांनी तरुण पिढी व लहान मुलांना महाराजांबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल माहिती मिळावी, तसेच त्यांच्या मनात एक उत्साह निर्माण व्हावा यासाठी मंडळाने गड-किल्ले व रांगोळी स्पर्धा गांधीनगर परिसरात व इतर विभागात आयोजित केली आहे. मंडळाने रायगड किल्ला बनवला असून रायगड किल्ला हा आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी आहे. प्रत्येक तरुणाला या पावनभूमीबद्दल अभिमान आहे. रायगड किल्ला बांधण्यासाठी मंडळाला ३०३ गोणी माती, पेपर, १० किलो लाकडाचा भुसा, शहाळे, इत्यादी वस्तू वापरण्यात आल्या. तसेच किल्ला बांधण्यासाठी संपूर्ण टाकाऊ वस्तू वापरण्यात आल्या असल्याचे प्रतिक पाटील याने सांगितले.
गांधीनगर मित्र मंडळाने उभारला रायगड किल्ला
November 9, 2018
189 Views
1 Min Read

-
Share This!