डोंबिवली :- ( शंकर जाधव ) उल्हासनगर – कल्याण परिसरात वाईंन शॉप कलेक्शन गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांंना अडवून मारहाण करत लुटणाऱ्या टोळीवर अटक करण्यास कल्याण गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. टोळीतील सहा जणांना अटक केली आहे.
हरीशकुमार गोश्वमी, गणेश सोनावाने यासह सहा आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वाईंन शॉप कॅश घेऊन जाणाऱ्यांना लुटण्याचे प्रकार वाढले होते. वाईंन शॉप एजसीचे कॅशयर वाईंन शॉप आणि बारची रोख रक्केमची वसुली करून मुख्य कार्यालयात येत असताना त्याच्यावर पाळता ठेऊन रात्रीच्या अंधारात मारहाण करून जबरीने हुसकावून घेण्यात येत होते. या टोळीने जानेवारी महिन्यात राजा वाईन्स आणि ऑक्टोबर महिन्यात महेश वाईन्स कंपनीच्या एजंशी कडून सुमारे साडे सहा लाख रुपये लुटण्याचे तपासात निषपन्न झाले आहे. अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) प्रवीण पवार, पोलीस उप आयुक्त ( गुन्हे ) दीपक देवराज , स्पोनी बाजीराव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनी संजू जॉन , सपोनी संतोष शेवाळे, पोउपनी पवन ठाकूर, नितीन मुद्गून,निलेश पाटील, सपोउपनी साळुंखे , पोलीस हवालदार जोगमार्गे,मालशेट्टे,पोलीस नाईक बंगारा व पोलीस पथकाने ही कामगिरी बजावली.