ठाणे

अपंग वडीलांचा आधार असलेला मुलगा हरपला; अपघात नसुन कट रचल्याचा वडीलांचा आरोप

अंबरनाथ दि. १३ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
        अंबरनाथ म्हाडा कॉलनी परिसरातील एमआयडीसी रोडवर दुपारी एका बसच्या धडकेत कॉलेजमधील दोघा तरुणांचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर आरोपी आणि काही दिवसातच बस सोडुन देण्यात आले आहे. या प्रकरणात बस चालकावर संशय व्यक्त करुन या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी मृत्य तरुणाच्या वडीलांनी केली होती. मात्र या प्रकरणात तपास केला जात नसल्याने मृत्य तरुणाच्या वडीलांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.
२६ ऑक्टोंबर २०१८ रोजी दुपारी १.१५ वाजता दिपक मानवतकर यांचा १८ वर्षाचा मुलगा तेजेश मानवतकर हा आपला मित्र चंद्रशेखर कुशवाह यांच्या सोबत साऊथ इंडियन कॉलेजमधुन परिक्षा देऊन घरी परतत होता. यावेळी म्हाडा कॉलनीजवळ त्यांची दुचाकी आलेली असतांना एक भरधाव बसने त्यांना मागुन धडक दिली. यावेळी बस ही रिकामी होती. अपघातात दोघे तरुण बसखाली आल्याचे लक्षात येताच बसचा चालक जयवमत पवार याने पळ काढला. या अपघातात जखमी झालेला तेजेश आणि चंद्रशेखर हे दोघेही मृत झाले. या अपघातानंतर बसचा चालकाला पोलीसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले. तर काही दिवसातच अपघातग्रस्त बसही सोडण्यात आली. मात्र या प्रकणरात तेजेश यांचे वडील दिपक मानवतकर यांनी बस चालकावर संशय व्यक्त केला आहे. कट रचुन हा अपघात घडविण्याचा आल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत नमुद केले आहे. अपघाताच्या वेळेस दुचाकीला जी धडक बसली ती बसच्या उजव्या बाजने बसली. यावरुन स्पष्ट होते की बस चालक ज्या बाजुला बसला होता त्याच बाजुने धडक बसल्याने हा प्रकार जाणून बुजुन केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. अपघातानंतर दोन्ही मुले जिवंत असतांनाही बस चालकाने त्यांना रुग्णालयात न नेता घटनास्थळावरुन पळ काढला. त्याने या मुलांना रुग्णालात हलविले असते तर त्यांचा जिव वाचला असता असेही या तक्रारीत नमुद केले आहे.
या प्रकरणात बस चालकाची चौकशी केल्यास नेमका हा कट का रचण्यात आला याची माहिती पुढे येऊ शकते असे तक्रारीत नमुद केले आहे. या अपघाताची चौकशी केल्यास हा सर्व प्रकार कट रचुन केल्याचे समोर येईल असे मानवतकर यांनी स्पष्ट केले आहे. मात्र आपल्या तक्रारीची दखलच घेतली जात नाही म्हणून या प्रकरणात मानवतकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.
मानवतकर हे अपंग असुन तेजेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. अपंग वडीलांचा आधार होईल या आशेवर जगणारे वडील यांचा महत्वाचा आधारच हरपला आहे. त्यामुळे आमच्या जगण्याची उम्मीदच नष्ट झाली आहे. मात्र मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणा-यांना योग्य शिक्षा देण्यासाठी आपला संघर्ष सुरु राहील असे मानवतकर यांनी स्पष्ट केले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!