अंबरनाथ दि. १४ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
अंबरनाथमध्ये विविध ठिकाणी जलाशयाच्या किनाऱ्यावर उत्तर भारतीय महिलांनी विधिवत रूपाने पुजा-अर्चना करून छठपुजाचा सण हा उत्साहात साजरा करण्यात आला. या छठपुज्याचे औचित्य साधून येथील स्थानिक भूमिपुत्रांनी पुजा स्थळी विविध सुविधा उपलब्ध करून देत त्यांना छठपुजेचे शुभेच्छा दिल्या.
अंबरनाथ पश्चिमेकडील बुवापाडा परिसरातील तेलंगे खदान याठिकाणी उत्तरभारतीय विभाग के शहरप्रमुख प्रमोदकुमार चौबे यांनी “विशाल छठपुजेचे” आयोजन केले होते. हजारोंच्या संख्येने उत्तर भारतीय महिलांनी येथे “छठमैया” ची पूजा करत परंपरेनुसार मावळत्या सूर्याला जल अर्पण केले. याप्रसंगी येथील स्थानिक नगरसेविका श्रुती सुरेश सिंह, नगरसेवक सुरेंद्र यादव, समाजसेवक मनोज सिंह, प्रमोद पांडेय, शैलेंद्र यादव, मनीष सिंह यांच्यासह अनेक हिंदी भाषी नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे येथील समाजसेवक मनोज सिंह व नगरसेविका श्रुती सिंह हे गेल्या ८ वर्षांपासून येथील खदानाची साफसफाई करून नागरिकांना लायटिंगची व्यवस्था करून देतात. याठिकाणी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उपस्थिती दर्शवित उत्तर भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
त्याचप्रमाणे पश्चिमेकडील चिंचपाडा खदान याठिकाणीही नगरसेवक प्रदीप नाना पाटील, उमेश पाटील, अर्चना चरण रसाळ, चरण रसाळ यांनी मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन केले होते व विविध सुविधा देखील याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.