अंबरनाथ दि. १४ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
भारताचे पहिले पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या १२९ व्या जयंती निमित्ताने आज सकाळी काँग्रेसच्या इंदिरा भवन कार्यालय येथे नेहरु यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अंबरनाथ पूर्वेकडील नेहरु गार्डन येथील ही पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुतळ्यास शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. यशवंत जोशी व महिला शहराध्यक्षा नीलिमा नायडू यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानंतर लहान मुलांना खाऊचे ही वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला अंबरनाथ शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. यशवंत जोशी, अनंत राजे, महिला शहराध्यक्ष नीलिमा नायडू, नगरसेवक उमेश पाटील, पंकज पाटील, सुभाष पाटील, साजिद पठाण रोहितकुमार प्रजापती यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.