डोंबिवली: ( शंकर जाधव ) राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णायलयाची घेतली. बुधवारी तपासे यांच्यासह पदाधिकाऱ्यानी रुग्णालयाची पाहणी केली. या रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधला असता रुग्णालयात औषधे मिळत नसल्याचे सांगितले.तसेच प्रभारी वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर सावकारे यांच्याशी चर्चा केली असता डॉक्टरांची भरती करणे गरजेची असल्याची वास्तविकता मांडली.
राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे आणि सोशल मिडीया सेलचे कल्याण-डोंबिवली जिल्हा सन्मयक निरंजन भोसले, प्रसन्न अचलकर, राजेंद्र नांदोस्कर आणि समीर गुधाटे यांनी शास्त्रीनगर रुग्णायलयाची पाहणी केली. सर्व वाॅॅडची पाहणी केल्यानंतर रुग्णालयाची अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली.रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना बसण्यासाठी ठेवलेल्या खुर्च्याही मोडकळीस आल्या असल्याचे दाखवत अशीच अवस्था या रुग्णालयाची असून राष्ट्रवादीच्या वतीने पाच खुर्च्या देण्यात येतील असे तपासे यांनी यावेळी सांगितले. यावेळी बाह्यरुग्णांशी तपासे यांनी संवाद साधला असता त्यांनी या रुग्णालयात औषधे मिळत नसून वेळेवर डॉक्टर्स उपलब्ध होत नसल्याची तक्रार तपासे यांच्याकडे केली. तसेच बाहेरील ठराविक दुकानातीन औषधे आणि सोनोग्राफी सेंटर करून घेण्याची जबरदस्ती करण्यात येत असल्याचे या रुग्णांनी सांगितले.दररोज साडे सातशे ते आठशे बाह्यरुग्ण उपचारासाठी येत असून दिवसेदिवस यात वाढ होत आहे. डॉक्टरांची भरती करणे आवश्यक असल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर सावकारे यांनी सांगितले. दोन्ही रुग्णालयांच्या सर्वांगीण दुरुस्तीसाठी नॅशनल अर्बन हेल्थ मिशनकडे दोन कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून तो अद्याप मंजूर झाले नसल्याचे स्थायी समितीत प्रशासनाने सांगितले होते. यावर तपासे यांनी नॅशनल अर्बन हेल्थ मिशनबाबत सावकारे यांच्याशी चर्चा केली. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याणच्या रुक्मिणिबाई व डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयांची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे. तर प्लास्टर पडून आतील शिगा दिसत आहेत.यासंदर्भातही तपासे यांनी सावकारे यांना जाब विचारला.पाहणी केल्यानंतर तपासे म्हणाले, राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे डोंबिवली मतदार संघाचे आमदार आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे हे डॉक्टर असून पालिकेच्या रुग्णालयाची अशी अवस्था आहे.तातडीने या रुग्णालयात दोन स्त्रीरोग तज्ञाची भरती केली पाहिजे. प्रभारी वैद्यकीय अधिकारी चंद्रशेखर सावकारे यांनी वारंवार सामान्य प्रशासनाला याबाबत पत्र दिली आहे. त्याला केराची टोपली दाखवली आहे.या रुग्णालयात शवविच्छेदन तज्ञ राज्यशासनाने पाठविले पाहिजे.शास्त्रीनगर रूग्णालयात सोनीग्राफी सेंटर असून त्यासाठी रेडीओलोजीस्टची भरती केली पाहिजे. राज्यशासनाने याचा विचार केला पाहिजे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नेहमी गरीब जनतेच्या बाजूने उभे राहिली आहे.
राष्ट्रवादि कॉंग्रेस परतीचे सर्वेसर्वा शरद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १२ डिसेंबर रोजी पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील चिदानंद रक्तपेठित राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रक्तदान करणार आहेत.सकाळी १० वाजून १० मिनिटांनी रक्तदानाला सुरुवात होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यावेळी रक्तदान करावे अशी विनंती राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.