गुन्हे वृत्त

चरस बाळगणाऱ्या काश्मिरी तरुणाला कल्याणमध्ये ठोकल्या बेड्या

ठाणे : चरस बाळगणाऱ्या काश्मिरी तरुणाला महाराष्ट्र एटीएसच्या पथकाने बेड्या ठोकल्या. ही उत्तम कामगिरी कल्याण – शिळ मार्गावर करण्यात आली. या तरुणाकडून दुचाकी व 1800 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला आहे. चरस बाळगल्या प्रकरणी मुंबई एटीएस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. या आरोपीला न्यायलयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, या अमलीपदार्थ तस्करीत आणखी कोण कोण सामील आहेत, याचा तपास एटीएसचे पथक करत आहेत.

मूळचा काश्मिरमधील ताहसील पहेलम, जि. अनंतनाग येथील रहिवासी असलेल्या एक तरुण चरस घेऊन कल्याण – शिळ मार्गावर येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसच्या पथकाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावला. ठरल्यानुसार 12 नोव्हेंबर 2018 रोजी कल्याण – शिळ मार्गावर दुचाकीवरून काश्मिरी तरुण येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे 1800 ग्रॅम चरस आढळून आला.
या प्रकरणी 13 नोव्हेंबर 2018 रोजी (गु. र. क्र. 12/18) एनडीपीएस कायदा कलम 8(क), 20, 22 नुसार गुन्हा दाखल करून कश्मिरी इसमाला अटक करण्यात आली. काश्मिरी इसमाला न्यायालयात हजर केले असता 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!