डोंबिवली ( शंकर जाधव ) बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या “एन” विभागातील विक्रोळी पार्कसाईट महानगरपालिका इंग्रजी शाळेतील चार विद्यार्थ्यांची गोंदिया येथे होणाऱ्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. महानगरपालिकेमधील विद्यार्थ्यांची हालाखीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये मिळविलेल्या या स्पृहणीय यशाबद्दल सर्व स्तरावरुन यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. शाळेने दरवर्षी विविध स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर यश संपादन करण्याची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. शाळेतील कु. सचिन इंगळे आणि कु. शिवा साबळे या विद्यार्थ्यांची १७ वर्षांखालील वयोगटामध्ये तर कु. निखिल मिश्रा आणु, कु. समिरा शेख यांची १४ वर्षे वयोगटामध्ये राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. निवड झालेले विद्यार्थी-विद्यार्थींनी हे गरिब असून त्यांचे खेळातील काम मात्र उल्लेखनीय आहे. महेश पालकर (शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका) यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना भविष्यातील यशस्वीतेकरीता शुभेच्छा दिल्या. यावेळी उप शिक्षण अधिकारी प्रकाश चव्हाटे,जयश्री यादव,एन विभाग प्रशासकीय अधिकारी भास्कर बाळसराफ,वरिष्ठ पर्यवेक्षक शा.शि.विभाग रामेश्वर लोहे, प्राचार्य शा.शि.विभाग रविंद्र परदेशी, कनिष्ठ पर्यवेक्षक शा.शि.विभाग रेणू निशाणे, सुरेश सावंत, एन विभाग निरीक्षक अलका शिवदे यांनी मार्गदर्शन केले. शालेचे मुख्याध्यापक कैलास सरोदे आणि शा.शि.शिक्षिका प्रिया पेंडुळकर यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले.
विक्रोळी महानगरपालिका शाळेतील चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड
November 15, 2018
55 Views
1 Min Read

-
Share This!