उल्हासनगर : उल्हासनगर शहरामध्ये मोहंमद पैगंबर सरकार यांचा जन्मदिन जस्ने ईद मिलादुन नबी जल्लोषात साजरी करण्यात आली,यावेळी शहरात विविध भागात मिरवणूका काढण्यात आल्या ,या मिरवणुकी वेळी गांधीनगर शिवसेना शाखा प्रमुख नाशिर खान यांच्या तर्फे बिर्याणी, पाणी वाटप तर आझाद नगर मस्जिदचे अध्यक्ष शमशाद अली यांनी मिरवणुकी दरम्यान मिठाई वाटप सर्व समभाव ,राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन यावेळी घडवून आणले, मुस्लिम बांधव उल्हासनगर शहरातून विविध भागातून मिरवणुका काढून शांती नगर येथे या मिरवणुका समाप्त होतात,सर्व समाजातील बांधव मुस्लिम बांधवान सोबत मिरवणुकात सामील होऊन शांतीचा संदेश देत जल्लोषात हा उत्सव साजरा करताना दिसत होते,यावेळी शिवसेनेचे शहर पदाधिकारी सामील होऊन सर्व धर्म समभाव -राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत होते.
जस्ने ईद मिलादुन नबी ! उल्हासनगर मध्ये जल्लोषात साजरी
November 21, 2018
33 Views
1 Min Read

-
Share This!