ठाणे

आगरी महोत्सवात  संस्कृती व कलेला महत्व देण्याची सभेत मागणी …

डोंबिवली : ( शंकर जाधव  ) आगरी महोत्सव समाजिमुख झाला पाहिजे यासाठी आगरी समाजाच्या पार पडलेल्या बैठकीत गोंधळ उडला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी हस्तक्षेप केल्याने मारामारी टळली. ह्या महोत्सवात आगरी समाजाची संस्कृती,कला सादर झाली पाहिजे असे सांगत या बैठकीत प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला हरकत घेत सदर प्रस्ताव एकमताने बनला नसल्याचे आगरी युथ फोरमच्या एका पदाधिकाऱ्याने यावेळी सांगितले.

      काळू कोमास्कर यांनी पुढाकार घेऊन निळजे येथील जेष्ठ नागरिक भवन सभागृहात आगरी समाजाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत गंगाराम शेलार, जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, संतोष केणे, डॉ. वंडार पाटील, अर्जुनबुवा चौधरी, जयेंद्र पाटील,एकनाथ पाटील, गणेश म्हात्रे, अॅड.भारतद्वाज चौधरी यासह अनेक मान्यवरांनी भाषणे केली.आगरी महोत्सव कसा असावा याबाबत सभेत सादर करण्यात आलेला प्रस्ताव काळू कोमास्कर यांनी वाचून दाखविला.आगरी समाजात अनेक कवी. गायक, वकील, डॉक्टर, साहित्यिक आहेत. त्यांना या महोत्सवात व्यासपीठ दिले पाहिजे, आगरी समाजातील कला, संस्कृतीचे दर्शन या महोत्सवात दर्शन झाले पाहिजेत, असे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले.या महोत्सवात गेल्या वर्षी केरळ संस्कृती दाखविण्यात आल्याने नाराजी सुरु उपस्थित समाज बंधावाकडून उमटला होता. मात्र आपण एका व्यक्ती विरोधात नसून आगरी महोत्सव कसा झाला पाहिजे यावर चर्चा करण्यासाठी एकत्र आलो आहोत असे कोमास्कर यांनी सांगितले. यावेळी आगरी युथ फोरमचे रामकृष्ण पाटील यांनी सभेत आलेल्या सूचनांचा विचार केला जाईल असे यावेळी सांगितले. काही वेळाने सभेतील दोन व्यक्तीमध्ये जोरदार वाद झाला.या वादाचे पर्यावसन हाणामारीत होऊ नये म्हणून उपस्थित मान्यवर मध्ये पडले. सभेत गालबोट लागणार होते हे मला आधीच माहित होते, मात्र सभा शांततेत पार पडली पाहिजे हे मी सभेच्या सुरुवातीला सांगितले होते असे यावेळी कोमास्कर यांनी सांगितले.

     यासंदर्भात आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांना विचारले असता ते म्हणाले, या सभेत मांडलेल्या सुचनाचे आम्ही महोत्सवात पालन करत असतो.मात्र त्यांनी आगरी युथ फोरमवर केले आरोप आम्हाला अमान्य आहेत.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!