ठाणे

लोकवर्गणीतून  नंदिवलीतील खड्डेमय रस्त्याची दुरुस्ती

कल्याण :  कल्याण पुर्वेकडील मलंग रोड नांदीवली परिसरातील अनमोल गार्डनच्या मागील बाजूस असलेल्या साई बाबा मंदिर ते पार्वती आंगण येथील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकांना ये जा करताना त्रास सहन करावा लागत होता .त्यातच पावसाल्यात या रस्त्याची दैना उडाली होती  यामुळे नागरिकांना रस्त्यावरून ये जा करताना तारेवरची कसरत करावी लागत होती. यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची  नागरिकांकडून  मागणी करण्यात येत होती .या बाबत नगरसेविका उशनकर र्मिला गोसावी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकरी गणेश ढोणे यांनी पुढाकार घेत लोकवर्गणीच्या माध्यमातून या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावला आहे या रस्त्याचे काम अखेर आज लोकवर्गणीतून सुरू करण्यात आली आहे . सुमारे २००  मीटर  लांबीचा रस्ता असून लोकवर्गणीच्या माध्यमातून या रस्त्याचे डांबरीकरनाचे  काम सुरू करण्यात आले असून या कामाचे भूमिपूजन आज नगरसेविका उर्मिला गोसावी आणि राष्ट्रवादीचे पदाधिकरी गणेश ढोणे यांच्या हस्ते करण्यात आले .

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!