ठाणे

आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पौष्टिक आहार वाटप… अंबरनाथ युवासेनेच्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात

अंबरनाथ दि. ३० (नवाज अब्दुलसत्तार वणू)
          शिवसेना प्रणित युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या प्रेरणेतून, युवासेना सचिव व ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख वरुण सरदेसाई, खा.डॉ. श्रीकांत शिंदे व शिवसेना अंबरनाथ शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक ॲड. निखिल अरविंद वाळेकर यांनी अंबरनाथ येथील ठाकूरपाडा मधील आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना वर्षभर पौष्टिक आहार वाटपाच्या स्तुत्य उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी सकाळी केली.
           अंबरनाथ पूर्वेकडील आनंदनगर एमआयडीसी परिसरातील ठाकुरपाडा येथे असलेल्या रोटरी संचालित आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर आरोग्य ही लाभण्याच्या दृष्टिकोनातून युवासेनेचे महाराष्ट्र राज्य विस्तारक व अंबरनाथ पालिकेचे तरुण नगरसेवक ॲड. निखिल वाळेकर यांनी आदिवासी पाड्यातील ३०० विद्यार्थ्यांना आठवड्यातून पाच दिवस गुड-शेंगदाणा चिक्की, राजगिरा लाडू, उकडलेली अंडी व फळे यासारखे पौष्टिक खाद्यपदार्थ वाटप करण्याचा निश्चय केला आहे, या उपक्रमाची सुरुवात शुक्रवारी सकाळी सदर शाळेतील मुलांना जेवण देऊन करण्यात आली. यावेळी वाळेकर यांस सोबत युवासेनेचे शहराध्यक्ष उत्तम आयवळे, सचिव रुपेश देशावरे, प्रकाश डावरे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.
            युवासेना ही राज्यभरात युवकांच्या न्याय हक्कासाठी लढा देते. तसेच अंबरनाथ शहरात देखील दरवर्षी खेळांच्या स्पर्धा, नृत्यकला, शरीरसौष्ठब स्पर्धा, सराव परीक्षा यांचे आयोजन करीत असते, तसेच आता हा नाविन्यपूर्ण व विशेष म्हणजे हा उपक्रम वर्षभर चालणार असून या पौष्टिक आहारासोबत महिन्यातून एकदा शहरातील विख्यात नक्षत्र हॉटेलचे स्वादिष्ट जेवणही देण्यात येणार असल्याचे ॲड. निखिल वाळेकर यांनी सांगितले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या तर वाढेलच त्याच बरोबर त्यांना पौष्टिक आहार मिळाल्याने विद्यार्थी सदृढ व निरोगीही राहतील हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचेही निखिल वाळेकर यांनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!