ठाणे

नगराध्यक्षानीं केला अंबरनाथ डंपिंग ग्राऊंडचा दौरा… समस्या सोडवण्यासाठी नागरिकांना सहकार्याचे केले आवाहन

अंबरनाथ दि. ३० (नवाज अब्दुलसत्तार वणू)
          दिवसेंदिवस वाढत असलेली डंपिंग ग्राऊंडची समस्या व त्यावर पालिका प्रशासनातर्फे केले जात असलेले उपाय ह्या सर्व गोष्टीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत अंबरनाथ येथील डंपिंग ग्राऊंडचा दौरा केला.
         सध्या शहरात डंपिंग ग्राउंड मध्ये लागणारी आग व त्यातुन निघणाऱ्या धूर यामुळे सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना तसेच येथून ये-जा करणाऱ्या लोकांना खूपच त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी नुकताच एनजीटी म्हणजेच राष्ट्रीय हरित लवादाचे उच्च अधिकारी यांनीही सदर डंपिंग ग्राउंडची पाहणी केली आहे. पालिका प्रशासन देखील या सर्व समस्येवर उपाययोजना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. शुक्रवारी अंबरनाथ शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी सदर डंपिंग ग्राऊंडचा पाहणी दौरा केला, यावेळी त्यांचा सोबत आरोग्य सभापती शशांक गायकवाड, आरोग्य विभागाचे अधिकारी सुरेश पाटील, सुहास सावंत, पुंडलिक शेकटे, संदीप खोजे, श्रीनिवास चलवादी आदीही उपस्थित होते. 
           डंपिंग ग्राऊंडच्या समस्येवर पालिका प्रशासन चोख उपाय करत असून लवकरच या समस्येचे समाधान होईल अशी अपेक्षा व्यक्त करत शहरातील नागरिकांनीही यासाठी सहकार्य करावे, ओला व सुका कचरा वेगळा करावा, प्लास्टिकचा वापर शकतो टाळावा. असे आवाहनही त्यांनी शहरातील नागरिकांना नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी केले. डम्पिंग ग्राउंड वरील आग व धूर यावर नियंत्रण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा गाड्या लावण्यात आल्या असून त्यावर मातीही टाकण्यात येत आहे. त्याशिवाय लवकरच पालिकेच्या चिखलोली येथील सर्व्हे क्रमांक १३२ वर डम्पिंग होणार असून ही समस्या कायमस्वरूपी समाप्त होणार असल्याचेही नगराध्यक्षनी सांगितले.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!