महाराष्ट्र

मीरा भाईंदरमध्ये होणार बायो डायव्हर्सिटी पार्क – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

मुंबई, दि. 30 : मीरा भाईंदरमध्ये बायो डायव्हर्सिटी पार्क उभारण्याचे प्रस्तावित  आहे. 120 कोटी रुपयांच्या या पर्यटन प्रकल्पासाठी जमीन हस्तांतरित करण्याबरोबरच प्रशासकीय मंजुरी त्वरित देण्याच्या सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी आज प्रशासनाला दिल्या.

देशभरातील पर्यटकांच्या पसंतीला उतरेल असे बायो डायव्हर्सिटी पार्क मीरा भाईंदर महापालिका आणि पर्यटन विभाग, एमटीडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यासंदर्भात आज मंत्रालयात पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. आमदार नरेंद्र मेहता,महापौर डिंपल मेहता, ठाण्याचे जिल्हाधिकारी  राजेश नार्वेकर आदींसह जिल्हा प्रशासन,महापालिका आणि एमटीडीसीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनातर्फे या प्रकल्पाला३१ हेक्टर जमीन देण्यास संमती देण्यात आली आहे. महापालिका,राज्य सरकारच्या निधीतून इथे थीम रिसॉर्ट, सी फेस हॉटेल,आर्टिफिशियल लेक, बटरफ्लाय पार्क, योग केंद्रासह अनेकविध मनोरंजन, पर्यटन प्रकल्प इथे उभारले जाणार आहेत. समुद्रकिनारा जवळ असलेले एस्सेल वर्ल्ड आदींमुळे हे बायो डायव्हर्सिटी पार्क देशभरातील पर्यटकांना एक नवे डेस्टिनेशन म्हणून उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्यात यावी, असे निर्देश मंत्री श्री. रावल यांनी यावेळी दिले.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!