ठाणे

श्री जांबमुनी समाजाचा समाज जोडो अभियान २०१८ उत्साहात संपन्न

अंबरनाथ दि. ०३ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळ सोलापूर समिती तर्फे मादर, मादीगा, मादरू व मोची समाजाची संयुक्त बैठक आयोजित करून “समाज जोडो अभियान २०१८” ची सुरुवात अंबरनाथ मधून रविवारी करण्यात आली. समाजाचे अंबरनाथ शहराध्यक्ष विकास कानडे यांनी सदर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर व नगरसेवक निखिल अरविंद वाळेकर हे “प्रमुख पाहुणे” म्हणून उपस्थित होते.

अंबरनाथ पश्चिमेकडील गावदेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या श्री सदगुरु सिध्दारूढ स्वामी भाविक मंडळ मठ येथे सदर सभा पार पडली. यात मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, कर्नाटक आदी विभागातून समाज बांधवांनी हजेरी लावली होती. सोलापूर महापालिकेचे माजी महापौर संजय हेमगड्डी, समाज अध्यक्ष देवेंद्र भंडारे, उपाध्यक्ष हनमंता जंगम, सचिव सिद्धराम कामाटी, माजी नगरसेवक म्हसप्पा विटे, दिनेश म्हेत्रे, हनमंतू सायबोळू, नागनाथ कसोळीकर, सिद्धराम काडाजी, माजी अध्यक्ष बसवराज म्हेत्रे, कृष्णा म्हेत्रे, अंबादास गंगावती, पुण्याचे जिल्हाध्यक्ष मारुती अण्णा पंदरी, सचिव शेखर भंडारी, साईनाथ तेलंगी, जिंदप्पा देवनोळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
समाज बांधवांना एकत्रित करून त्यांचे विविध प्रश्न सोडविणे आणि सदर समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी मिळून कार्य करावे हाच ह्या आयोजना मागचा मुख्य हेतू असल्याचे शहराध्यक्ष विकास कानडे यांनी सांगितले. तसेच श्री सिध्दारूढ स्वामी भाविक मंडळ व श्री जांबमुनी मोची समाज सेवा मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या सहकार्याने सिद्धारूढ स्वामी मठ, समाजासाठी हॉल, कार्यालय व शाळा ह्या वास्तु लवकरच उभारण्यात येणार असल्याचेही कानडे यांनी यावेळी सांगितले. अध्यक्ष विकास कानडे सोबत उपाध्यक्ष कतलप्पा खाडे, सचिव सूर्यप्रकाश क्यादगी, संदीप पूजाटी, रामलिंग गदग, शंकर मिसे, संजय जगले, मुदय्या मिसाळ, गुरुनाथ चावणे, अशोक सासम, गंगप्पा सासम आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

About the author

Aapale Shahar

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

Advertisements

Advertisements

error: Content is protected !!