कल्याण :- ( विशेष प्रतिनिधी ) एके काळी गत वैभव असलेली एनआरसी कंपनी बंद पडल्याने कामगारांच्या देणी संदर्भात स्वतः जातीने लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहने येथे बोलताना दिले.कल्याण पश्चिम विधान सभा आमदार नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शना खाली आयोजित केलेल्या जलयुक्त शिवार फुटबॉल स्पर्धेच्या अंतीम सामान्यांच्या उदघाटन समारंभाला राज्याचे मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.कार्यक्रमाचे आयोजक आमदार नरेंद्र पवार यांनी सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.महाराष्ट्र राज्य स्थापने नंतर केवळ दुसऱ्यांदा राज्याचा मुख्यमंत्री या भागात आल्याने इथल्या नागरिकांच्या अपेक्षा वाढल्याचे पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले..पुढे बोलताना त्यांनी NRC कंपनी आणि रिंगरूट बधितांचा प्रश्नही मांडला..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन करतांना याच मुद्द्याला प्राध्यान देत हे सरकार NRC कम्पणीच्या कामगारांची थकीत देणी आणि रिंगरूट बाधित नागरिकांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन दिले.एनआरसीचे कामगार आणि रिंगरूट बाधित नागरिकांचे निवेदन स्वीकारताना त्यांना अश्वस्त केले.कामगारांच्या हिताचं रक्षण करणे हे देखील महत्वाचे असून त्यानी दिलेल्या निवेदनात स्वतः जातीने लक्ष घालून कश्या प्रकारे हा प्रश्न सोडवून त्यांना न्याय देता येईल यसाठी खासदार कपिल पाटील आमदार नरेंद्र पवार यांची बैठक बोलावणार असल्याचे त्यांनी पुढे सांगितले .रिंग रुट मध्ये ज्यांची घरे जातील त्यांना बेघर होऊ न देता त्यांना घेर कशी मिळतील त्यासाठी मार्ग काढला जाईल याचाही विचार करण्यात येणार असल्याचे सांगितले.. पुढे बोलतांना फडणवीस यांनी सीएम चषक स्पर्धेचे महत्व विषद केले.महाराष्ट्रा तील खेळाडूंना चांगले व्यासपीठ मिळावे तसेच विविध खेळाला वाव मिळावा व आजची युवापिढी मैदानावर दिसावी या करता सीएम चषकाचे आयोजन करण्यात आले..या स्पर्धेच्या माध्यमातून २० लाख खेळाडूंनी विविध स्पर्धेत भाग घेत आपले रजिस्ट्रेशन केले.ही संख्या पन्नास लाखाच्या घरात जाईल असा विश्वास व्यक्त करीत यास्पर्धेला अभूतपूर्व समर्थन मिळाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मोहने येथील एनआरसी मैदानावर झालेल्या या कार्यक्रमाला खासदार कपिल पाटील,दुग्धविकास मंत्री महादेव जानकर,आमदार किसन कथोरे,आमदार गणपत गायकवाड गायकवाड, आमदार रमेश पाटील,ठाणे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर , आयुक्त गोविंद बोडके,पालिका उपमहापौर उपेक्षा भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.