डोंबिवली :- ( विषेश प्रतिनिधी ) निळजे येथील सर्वोदय अनाथ विद्यालयाच्या अनाथ विद्यार्थ्यांची वार्षिक फी महेश पाटील प्रतिष्ठाशच्या वतीने भरण्याचा संकल्प करण्यात आला. भाजप नगरसेवकमहेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंवर सभागृहात आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा लाभ जेष्ठ नागविशेष आणि अनेक नागरिकांनी घेतला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.यावेळी सर्व प्रकारच्या तपासणी विनामुल्य करण्यात आली होती.तसेच वाढदिवसा निमित्त पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात वृद्धाश्रमात आणि अनाथश्रमात फळे वाटप, जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
भाजप नगरसेवक महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्र. ८२ मधील अंबिका नगर मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळीकल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी विलास जोशी, भारत पवार, देगलूरकर हे अधिकारी उपस्थित होते. खिडकाळी येथील अनाथाश्रमातील मुलांना बिस्कीट वाटप करण्यात आले.व जेष्ठ नागरिकांना अल्पोपहार देण्यात आला.गोग्रासवाडीतील स्वयंमवर सभागृहात मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसरात अन्नदानाचे वाटप करण्यात आले.शास्त्रीनगर रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.उंबार्ली येथील जाणिव वृध्दाश्रमात धान्य वाटपकरण्यात आले. निळजे येथील सर्वोदय अनाथ विद्यालयाच्या अनाथ विद्यार्थ्यांची वार्षिक फी महेश पाटील प्रतिष्ठानच्या वतीने भरण्याचा संकल्प करण्यात आला. महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, याप्रसंगी नगरसेविका डॉ.सुनिता पाटील,नगरसेविका सायली विचारे,पल्लवी महेश पाटील, नगरसेवक मुकुंद पेडणेकर,निलेश म्हात्रे, खोणी ग्रामपंचायतीचे सरपंच हनुमान ठोंबरे,डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष संजीव बिरवाडकर,परिवहन समिती सदस्य संजय राणे, वार्ड प्रमुख नितीन कोळी,रवीसिंग ठाकूर, समीर कांबळे, भाजप अल्पसंख्य विभागाचे सिंकदर मकाणी, कर्ण जाधव, नगरसेवक निलेश म्हात्रे, दत्ता वाठोरे, डोंबिवली ग्रामीण अध्यक्षा रसिका पाटील, सुरेखा पांडे, संजना सातबाई,राधिका मोरे,अॅड.माधुरी जोशी आदि मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.डोंबिवली स्टेशनबाहेरील परिसरात गरिबांना मोफत अल्पोपहार वाटप करण्यात आले. पाथर्ली येथील पालिकेच्या आचार्य भिसे शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले.