अंबरनाथ दि. ०६ (नवाज अब्दुलसत्तार वणू)
स्वतंत्र युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष अभिजीत करंजुले-पाटील यांच्या ७/१२ वाढदिवसानिमित्त अंबरनाथ शहरातील विविध भागात संपूर्ण दिवसभरात शैक्षणिक, वैद्यकीय, स्वछता अभियान, वृक्षारोपण आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन त्या-त्या भागातील हितचिंतक, मित्र मंडळी, स्वतंत्र युवक संघटना, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व सामाजिक सेवाभावी, संस्थाच्या वतीने करण्यांत आल्याची माहिती राष्ट्रवादि काँग्रेस विध्यार्थी सेल ठाणे जिल्ह्यध्यक्ष के. श्रीकांत रेड्डी व सामाजिक कार्यकर्ते विश्वासराव निबाळकर यांनी दिली.
“खरातो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे” या साने गुरुजींच्या तत्वांचे अनुसरण हे आपल्या जीवनाचे खरे गमक आहे. अशा प्रेमळ, मनमिळावू आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन सर्वाना आपल्या प्रेमळ स्व:भावाने आपलेसे करणाऱ्या अभिजीत करंजुले- पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता अंबरनाथच्या पुरातन शिवमंदीर येथे अभिषेक व त्यानंतर बालाजी मंदिर येथे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेल ठाणे जिल्ह्यध्यक्ष के. श्रीकांत रेड्डी यांनी सलग चौथ्या वर्षी महाअभिषेक व प्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे. सकाळी ८ वाजता शिवाजी चौक येथील २०० नाका कामगाराना लाईफ जॅकेट व मफलर वाटप कार्यक्रमाचे आयोजन संजय जाधव यांनी केले आहे.
तर अंबरनाथ पश्चिम मधील बुवापाडा येथे माजी नगरसेवक लालमन यादव यांनी सकाळी १० ते १ नेत्र तपासणी शिबीर व बुवापाडा संघटन चौक येथे सकाळी ११:३० ते १२:३० चे दरम्यान गरजूना साहित्य व धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन सुरज सिंग व एस. एस. ग्रुप यांनी केले आहे. सकाळी १०:३० ते १२:३० चे दरम्यान नवीन भेंडीपाडा उर्दू शाळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन सुभाष सरोदे व अमित खान यांनी केले आहे. नेताजी मार्केट येथे दुपारी १२ वाजता गरजूना साहित्य व धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन सिकंदर आणि अजहर कुरेशी यांनी केले आहे. छाया हॉस्पितीलमध्ये १२:३० चे दरम्यान उच्च दर्जाच्या रेग्झिनच्या १०० उशांचे वाटपाचे आयोजन विश्वासराव निबाळकर यांनी केले आहे.
अंबरनाथ पूर्व विभागातील वडवली शाळा आणि लोकल बोर्ड शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच कमलधाम वृध्दाश्रमातील वृद्धांना पोषक फळाचा ट्रेटा पॅक ज्युस व कपाट वाटप कार्यक्रम तसेच नॅब अंध संस्थेचा आवश्यकतेनुसार बेडशीट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनुग्रह येथील अनाथाश्रमातील मुलाना खेळाचे साहित्य व खाऊ वाटपाचे आयोजन निखिल चावरे यांनी केले आहे. रात्री ८ वाजता स्वानंद शॉपिंग सेंटरच्या टेरेसवर या निमित्ताने मोठया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.