ठाणे

डोंबिवली पश्चिमेत तीव्र पाणी टंचाई; पाण्यासाठी नागरिकांची टॅॅकरवर झुंबड

डोंबिवली  :  ( शंकर जाधव  )  पश्चिमेतील गरिबाचा वाडा येथील जलकुंभाची गळती दुरुस्ती करण्यासाठी बंद करण्यात आलेल्या पाणी पुरावठ्यामुळे तेथील नागरिकांनी पाण्याच्या टॅॅकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे.जरी महापालिकेकडून नागरिकांना मोफत पाण्याचे टॅॅकर देण्याची सोय करण्यात आली असली तरी हवे तेवढा पाणी मिळत नसल्यामुळे महिलावर्गत वादावादी पर्यंत मजल गेल्याचे पहावयास मिळत आहे.
          गेल्या ६  महिन्यांपासून डोंबिवली पश्चीमेतील गरीबाचावाडा  जलकुंभाच्या टाकीमधील गळतीमुळे पाणी २४  तास वाहत आहे. अतिशयवेगाने पाणी वाहत असल्याने हा सर्व परिसर जलमय होतो. त्यामुळे अनेक वेळा येथील लोकांना कमी  दाबाने पाणी पुरवठा होतो. तसेच या वाहत्या पाण्यामुळे टाकी लवकर  रिकामी होत असल्याचे रहिवाशांचे  म्हणणे आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा अधिका-यांना अनेकवेळा याबाबत स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधी यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. तरी देखील या बाबत प्रशासनाला गांभीर्यच नाही. डोंबिवलीत दर मंगळवारी पाणीपुरवठाबंद ठेवण्यात येतो. त्यामध्ये नागरिकांची विशेषतः महिलावर्गाचे अतोनात हाल होत असताना दुसरीकडे असे लाखो लीटर पाणी दररोज वाया जात असल्याने नागरीक संताप व्यक्त करीत आहेत. अखेर याबाबत अनेकांनी तक्रारी केल्याने महापालिकेकडून सदर जलकुंभ दुरुस्तीसाठी सुमारे १५  दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचा मोठा फटका त्या जलकुंभातुन पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्रनगर, गरिबाचावाडा, गायकवाडवाडी,नावापाडा येथील लाखो नागरिकांना बसला आहे. महापालिकेकडून नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाण्याचे टॅॅकरची सोय केली आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत टँकरची संख्या खूपच अपुरी असल्याचे नागरिकांमध्ये पाण्यावरून वाद होताना दिसून येत आहेत., जर लवकरच या पाणी समस्येच्या जुंबडीवर तोडगा काढला नाही तर भविष्यात एखाद्या व्यक्तीच्या जीवर भेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे अनिरुद्ध सराफ यांनी सांगितले आहे की, पाणी कापतीवर पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांसाठी मोफत पाण्याचे टँकर दिले जात आहे. दररोज तीन टॅॅकरद्वारे १०  ते १५  फेऱ्या मारून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात असून अजून पुढील १०  दिवस या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

YouTube Subscriber

E-Paper

Advertisements

महाराष्ट्र

Advertisements

Advertisements

नवी मुंबई

error: Content is protected !!